Suhana Khan, Agastya Nanda Google
मनोरंजन

अमिताभ बच्चन यांचा नातू अनं शाहरुखच्या लेकीचं अखेर ठरलं?

सुहाना खान आणि अगस्त्य नंदा लवकरच जोया अख्तरच्या सिनेमात एकत्र दिसणार असल्याची चर्चा आहे.

प्रणाली मोरे

बॉलीवूडचा सुपरस्टार शाहरुख खानची(Shah Rukh Khan) मुलगी सुहाना (ISuhana Khan)ही अद्यापतरी सिनेइंडस्ट्रीत नसली तरी देखील सोशल मीडियावर तिचा चाहता वर्ग भलामोठा आहे. सोशल मीडियावर ती नेहमीच सक्रिय असते. ती नेहमीच आपले स्टायलिश फोटो सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करीत असते. तिनं तिचं शिक्षण अमेरिकेत पूर्ण केलंय. सध्या ती भारतात परत आली आहे आणि मुंबईत आपल्या आई-वडिलांसोबत राहत आहे. नुकतंच सुहानाला प्रसिद्ध दिग्दर्शिका झोया अख्तरच्या ऑफिसमधून बाहेर पडताना स्पॉट केलं गेलं. याआधी सुहाना भारतात नसताना ही बातमी कानावर पडली होती. पण त्यात तथ्य नसल्याचं नंतर बोललं गेलं.

पण आता सुहानाला झोयाच्या ऑफिसमधून बाहेर पडताना पाहिलं गेल्यानं पुन्हा त्या चर्चेला उधाण आलंय की सुहाना लवकरच झोयाच्या सिनेमात दिसणार आहे. सूत्रांच्या सांगण्यानुसार सुहाना झोयाच्या ज्या सिनेमात दिसणार आहे तो प्रसिद्ध कॉमिक्स आर्चीवर आधारित असणार आहे. आता अजूनतरी यावर अधिकृतरित्या सांगण्यात आलं नसलं तरी बोललं जातं आहे की या सिनेमात सुहानासोबत श्रीदेवीची मुलगी खुशी कपूर(Khushi Kapoor) आणि अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा(Agastya Nanda) महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. म्हणजे लवकरच सुहाना आणि अगस्त्या मोठ्या पडद्यावर कदाचित एकत्र रोमान्स करताना दिसतील.

सुहानाला यावेळी एका हॉटेलमध्येही जाताना पाहिलं गेलं. यावेळी तिनं सफेद रंगाचा स्पगेटी टॉप आणि जीन्स असा साधा पेहराव केला होता. तिनं कोविडच्या नियमांचे पालन करताना मास्कचा वापर केला होता. अगदी साध्या लूक मध्ये दिसणाऱ्या सुहानानं यावेळी पापाराझीला मात्र फोटोसाठी कोणतीही पोज दिली नाही. ती सरळ आपल्या गाडीत जाऊन बसली. अलिकडेच दीपिकाच्या 'गहराइयां' सिनेमाचं स्क्रीनिंग शाहरुखच्या मन्नतमध्ये ठेवण्यात आलं होतं. तेव्हा सिनेमा पाहून सुहानाला तो इतका आवडला की तिनं लगेच आपली खास मैत्रिण अनन्या पांड्ये हिला सोशल मीडियावर सिनेमासाठी शुभेच्छा दिल्या. सुहाना नेहमीच अनन्याच्या फोटोवर प्रतिक्रिया देत असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trump on Iran: अमेरिका-इराण चर्चेत मोठी घडामोड! अण्वस्त्र बनवू देणार नाही, करार होईपर्यंत निर्बंध कायम; ट्रम्प यांचा इशारा

Maharashtra Diesel Rules : डिझेल खरेदीसाठी महाराष्ट्र शासनाकडून नियम-अटी जाहीर; शेतकऱ्यांची गैरसोय टळणार

MLC Election: विधान परिषद जागावाटपावरून महायुतीत तणाव! शिंदेंनंतर संकटमोचक महाजन दिल्लीला रवाना; कोणत्या जागेवर पेच वाढला?

Junnar Road Crash: डिंगोरे येथे एसटी बस–दुचाकी भीषण अपघातात चार तरुणांचा मृत्यू

KKR vs DC: KL Rahul बरसला! अखेरच्या सामन्यात दिल्लीचे कोलकातासमोर मोठे लक्ष्य; पण शेवट गोड कोण करणार?

SCROLL FOR NEXT