Suhana Khan Viral Video Esakal
मनोरंजन

Suhana Khan: 'आता हिलापण वानखेडेवर बंदी घालणार वाटतं..', सुहाना खानच्या व्हायरल व्हिडीओनं चर्चेला उधाण

सुहाना खानचा आयपीएल दरम्यानचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे,लोकांनी ज्याचा संबंध थेट शाहरुखच्या जुन्या वादाशी जोडला आहे.

प्रणाली मोरे

Suhana Khan Viral Video: शाहरुख खानची मुलगी सुहाना खान नेहमीच काही ना काही कारणानं चर्चेत असलेली पहायला मिळते. आता तिचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहेत ज्याला पाहिल्यानंतर लोक तिला शिव्या शाप देताना दिसत आहेत.

हा व्हिडीओ मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरचा आहे. रविवारी १६ एप्रिल,२०२३ रोजी सुहाना आपले वडील शाहरुख खान यांची टीम कोलकाता नाइट रायडर टीमला पाठिंबा देण्यासाठी पोहोचली होती. ईशान किशन आऊट झाल्यानंतर आता सुहानाची एक रिअॅक्शन व्हायरल होताना दिसत आहे. आणि त्यानंतर आता शाहरुख खानचा वानखेडेवरचा वाद लोकांना आठवला आहे.

सुहाना खाननं मॉडेलिंगच्या विश्नात पदार्पण केलं आहे. तिला एका मेकअप ब्रॅन्डचा चेहरा म्हणून निवडण्यात आलं आहे. सुहाना लवकरच 'द आर्चीस' सिनेमातूनही दिसणार आहे. सुहानाला अनेकदा क्रिकेटच्या मॅचेस पाहताना स्टेडियमवर पाहिलं जातं. रविवारी १६ एप्रिल रोजी सुहाना वानखेडे स्टेडियममध्ये होती. त्यावेळचा एक व्हिडीओ एका वेबसाईटनं अपलोड केला आहे. ज्याला कॅप्शन दिलं आहे की,'सुहानानं क्रिकेटर ईशान किशनला शिवी दिली का?'(Shahrukh Khan daughter suhana video of wankhede stadium viral video)

क्लीपमध्ये सुहाना लहान भाऊ अबरामसोबत काहीतरी खाताना दिसत आहे. ईशान आऊट झाल्यानंतर ती काहीतरी बोलताना दिसत आहे. तिच्या लिप सिंकवरनं लोक अंदाज लावताना दिसत आहेत की तिनं शिव्या दिल्या आहेत. ईशाननं खरंतर २१ चेंडूत अर्धशतक ठोकलं होतं. मुंबई इंडियन्सच्या विजयात त्याचं महत्त्वाचं योगदान होतं.

या व्हिडीओवर लोकांच्या विविध कमेंट्स येत आहेत. जास्तकरुन लोक सुहानाचं समर्थन करत आहेत. काहींनी मात्र सुहानानं अपशब्द वापरला म्हणून या व्हिडीओवर नकारात्मक कमेंट्सही दिल्या आहेत.

एकानं लिहिलं आहे, 'जसं ईशान किशन खेळत होता,त्यावरनं केआरके चं समर्थन करणारे शिव्या देणार नाहीत तर काय करणार'. तर आणखी एकानं लिहिलं आहे की,' मॅच पाहताना शिव्या कोण नाही देत'. काही लोकांनी परंपरा ,प्रतिष्ठा सारखे शब्द लिहित सुहानाला ऐकवंल आहे.

तर काहींनी या व्हिडीओचा संबंध थेट शाहरुखच्या वानखेडेवाल्या वादाशी जोडला आहे. काहींनी लिहिलं आहे की,'सुहानानं आणखी शिव्या द्यायला हव्या होत्या'.

माहितीसाठी सांगतो की २०१२ मध्ये शाहरुख खानचा वानखेडे स्टेडियम ऑथोरिटीसोबत वाद झाला होता. आयपीएल मॅचनंतर शाहरुख खान सुरक्षारक्षकांशी देखील भिडला होता. त्याचा आरोप होता की सुहानाला त्या लोकांनी धक्का मारला. या वादानंतर शाहरुख खानवर पाच वर्षासाठी वानखेडेवर येण्यास बंदी घातली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cough Syrup: नऊ चिमुकल्यांचा मृत्यू पण एकही पोस्टमार्टेम का नाही? कफ सीरप प्रकरणात धक्कादायक खुलासा, नेमकं काय घडलं?

Shakti Cyclone: चक्रीवादळ ‘शक्ती’चा तडाखा बसणार! नेमकं काय आहे हे आणि किती घातक असेल? याचं नाव कुणी ठेवलं? वाचा...

IND vs AUS Full Schedule: भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे संपूर्ण वेळापत्रक ! वाचा कधी, कुठे, केव्हा खेळणार; वेळ व Live Telecast

Madhya Pradesh : मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांना दसऱ्यालाच मिळालं दिवळीचं सुपर गिफ्ट; CM यादवांनी शेतकऱ्यांना दिले 653.34 कोटी

मोठी बातमी : भारतीय संघात राहायचा असेल तर... Rohit Sharma, विराट कोहली यांच्यासमोर अजित आगरकरने ठेवली अट

SCROLL FOR NEXT