Don 3 Big Update Esakal
मनोरंजन

Don 3 Big Update: कधी येतोय शाहरुख खानचा डॉन 3?..अखेर निर्मात्यानं केला खुलासा

सिनेमाचे निर्माते रितेश सिधवानी यांनी पीटीआयशी साधलेल्या संवादा दरम्यान 'डॉन ३' सिनेमाची स्क्रीप्ट ते रिलीजपर्यंत अनेक गोष्टींचे खुलासे केले आहेत.

प्रणाली मोरे

Don 3 Big Update: बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानसाठी २०२३ हे वर्ष खूपच उत्साही राहिलं. 'पठाण' सिनेमाच्या माध्यमातून त्यानं या वर्षाची सुरुवात एकदम धडाक्यात केलीत यानंतर 'जवान' सिनेमात तो लवकरच दिसणार आहे. त्यानंतर वर्षाच्या शेवटी सलमान खानच्या 'टायगर ३' सिनेमात तो कॅमियो साकारणार आहे. यासगळ्या दरम्यान शाहरुख खानच्या चाहत्यांसाठी आणखी एक मोठी आनंदाची बातमी आहे. त्याच्या 'डॉन ३' सिनेमाविषयी मोठी अपडेट समोर आली आहे. (Shahrukh Khan don finally to release producer reveal details)

जेव्हा बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या 'डॉन' सिनेमाचा रीमेक बनणार होता आणि त्यात शाहरुख खानला कास्ट केलं गेलं होतं तेव्हा यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. पण सिनेमा जेव्हा रिलीज झाला तेव्हा लोकांनी त्याला डोक्यावर उचलून धरलं. सिनेमाला चांगल्या प्रतिक्रिया मिळाल्या,याच्या दुसऱ्या भागानं देखील बॉक्सऑफिसवर बक्कळ कमाई केली. आणि आता याच्या तिसऱ्या भागाविषयी मोठी अपडेट समोर आली आहे.

पीटीआय सोबत साधलेल्या संवादा दरम्यान सिनेमाच्या निर्माते रितेश सिधवानी यांनी सिनेमा कन्फर्म येत आहे हे सांगितले आहे. त्यांच्या म्हणणण्यानुसार सिनेमाच्या स्क्रिप्टवर काम सुरू आहे. ते म्हणाले की,''जोपर्यंत त्यांचा पार्टनर फरहान अख्तर सिनेमाची स्क्रीप्ट लिहित नाही तोपर्यंत काहीच होणं शक्य नाही. सध्या फरहान सिनेमाच्या स्क्रीप्टवर काम करत आहे. आम्ही सगळेच 'डॉन ३' ला रिलीज करण्यासाठी उत्सुक आहोत''.

माहितीसाठी सांगतो की सध्या फरहान अख्तर इतरही काही मोठ्या प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त आहे. तो 'जी ले जरा' सारखा सिनेमा करत आहे ज्यात प्रियंका चोप्रा,आलिया भट्ट,कतरिना कैफ एकत्र काम करताना दिसणार आहेत.

तर शाहरुख खानविषयी बोलायचं झालं तर तो सध्या एटलीच्या 'जवान' सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या सिनेमातील अभिनेत्याचा लूक नुकताच समोर आला होता. याव्यतिरिक्त राजकुमार हिरानीच्या 'डंकी' सिनेमातही शाहरुख खान काम करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Buldhana Violence : बुलढाण्यात २ गटात राडा! तलवार अन् शस्त्रांनी वार; शिवसेना नगरसेवकासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा मृत्यू, ७ जण जखमी

Leopard : दुष्काळात तेरावा महिना, भेंडाळा शिवारात बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र सुरूच; पिंजरा लावण्याची मागणी

Phulambri News : तावडे केणेकरांच्या घरी, चव्हाण भाजप कार्यालयात..! पदवीधरच्या राजकारणात नेमके चाललेय तरी काय?

Mangalwedha News : दिल्लीच्या सीमेवर पंढरपूर मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यांना रोखले; गनिमी पद्धतीने जंतर-मंतरवर धडक, मागण्यांसाठी आंदोलन

भारत-अमेरिका व्यापार कराराची चर्चा ठप्प! अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT