Shahrukh Khan On Aryan Khan Esakal
मनोरंजन

Shah Rukh Khan On Aryan Khan: 'या' कारणामुळे कधीच अभिनेता बनू शकत नाही आर्यन खान.. एका मुलाखतीत शाहरुखचा मोठा खुलासा

आर्यन खान लवकरच लेखक म्हणून बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहे.

प्रणाली मोरे

Shah Rukh Khan On Aryan Khan: बॉलीवूडमध्ये नेहमीच असा ट्रेन्ड पाहिला गेलाय की जर कोणी अभिनेता हिट झाला तर त्याच्या मुलांकडूनही अनेक जण अभिनय क्षेत्रात काहीतरी धमाकेदार करण्याची आशा बाळगतात. अनेकदा असं होतं देखील पण बॉलीवूडचा किंग खान शाहरुख खानच्या मुलानं मात्र चाहत्यांच्या या आशेला पार गुंडाळून ठेवलं ना राव.

कारण शाहरुखचा मुलगा कधीच अभिनयात करिअर करताना दिसणार नाही. या गोष्टींचा खुलासा करत शाहरुख खान एकदा म्हणाला होता की माझा मुलगा कधीच अभिनेता बनू शकत नाही. (Shahrukh Khan On Aryan Khan filmy carrier Viral Video)

शाहरुख खाननं जुन्या मुलाखतीत आपला मोठा मुलगा आर्यन खानविरोधात मोठा खुलासा केला होता. या व्हिडीओत शाहरुख खाननं आर्यन संदर्भात बोलताना म्हटलं होतं की-माझा मुलगा आर्यन कधीच अभिनेता बनू शकत नाही कारण त्याला स्वतःलाच अॅक्टर बनण्यात इंट्रेस्ट नाही. आणि त्यामुळे मला देखील वाटतं की तो कधीच अभिनेता बनू शकत नाही. नेहमी भारतात पाहिलं गेलं आहे की वडील सिनेस्टार असले की मुलगा देखील सिनेस्टारच बनतो. तो हॅन्डसम आहे,उंच आहे. पण त्या स्वतःलाच याची जाणीव खूप योग्य वेळी झाली की तो अभिनेता बनू शकत नाही. हो पण तो उत्तम लेखक आहे.

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान खूप स्टायलिश आणि हॅन्डसम आहे. वो नेहमीच कोणत्या ना कोणत्या पार्टीत किंवा कार्यक्रमाला पोहोचतो तेव्हा अनेकांच्या नजरा त्याच्यावर खिळतात. शाहरुखची कॉपी म्हणून देखील त्याला संबोधलं जातं. आर्यन खानच्या इंडस्ट्रीतील पदार्पणाची सगळेच वाट पाहत आहेत पण शाहरुखची लेक सुहाना मात्र तिच्या धमाकेदार एन्ट्रीसाठी सज्ज झालीय. लवकरच द आर्चीज मध्ये ती दिसणार आहे. नुकतंच ती मेकब्रॅन्डची ब्रॅन्ड एंबेसेडर झाली आहे. लॉचिंगच्या वेळेला तिनं घातलेल्या रेड ड्रेसमधील तिचा फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT