Shahrukh Khan Pathan sequel confirm Before first release,writers adding new charactors Google
मनोरंजन

Shahrukh Khan: 'पठाण' च्या रिलीज आधीच रंगली सीक्वेलची चर्चा, समोर आली मोठी माहिती

'पठाण' सिनेमाच्या सीक्वेलमध्ये नवीन व्यक्तिरेखांचा समावेश करण्यात येणार असून त्यावर लेखकानं काम करायला सुरुवात केली आहे असं कळत आहे.

प्रणाली मोरे

Shahrukh Khan:शाहरुख खानच्या पठाण सिनेमाची त्याचे चाहते चातकासारखी वाट पाहतायत. २५ जानेवारी २०२३ रोजी सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. सिनेमात शाहरुख 'स्पाय' म्हणजेच गुप्तहेराची भूमिका साकारतोय. अर्थात यशराजचा सिनेमा असल्यामुळे आणि याआधीही यशराजने स्पाय थीमवर आधारित टायगरचे सुपरहिट दोन सिनेमे केल्यामुळे 'पठाण' कडूनही अपेक्षा उंचावल्या आहेत आणि लोकांमध्ये त्याप्रती उत्सुकता देखील आहे.(Shahrukh Khan Pathan sequel confirm Before first release,writers adding new charactors)

बोललं जात आहे की सलमानची टायगर ही व्यक्तिरेखा शाहरुखच्या 'पठाण' मध्ये जोरदार अॅक्शन करताना दिसणार आहे. यानिमित्तानं पठाण बनलेल्या शाहरुखच्या आणि टायगर बनलेल्या सलमानच्या अॅक्शनची जोरदार जुगलबंदी पाहणं लोकांसाठी पर्वणी ठरणार आहे. तर असंही कळालं आहे की सलमानच्या 'टायगर ३' मध्ये शाहरुख खानही 'पठाण' म्हणून धमाकेदार एन्ट्री करताना दिसेल. आता 'पठाण' विषयी उत्सुक असलेल्या चाहत्यांसाठी आणखी एक मोठी बातमी कानावर पडते. 'पठाण' सिनेमाचा सीक्वेलही आता बनणार आहे.

एका इंग्रजी वृत्तपत्रानं दिलेल्या माहितीनुसार कळतंय की, 'पठाण'च्या मेकर्सनी त्याचा सीक्वेल बनवण्याचं देखील ठरवलं आहे. बोललं जात आहे की सीक्वेलमध्ये आणखी नवीन व्यक्तिरेखा पहायला मिळणार आहेत. एका सूत्राच्या माहितीनुसार,'पठाण' सिनेमाच्या सीक्वेलवर काम करणं सुरु झालं आहे. सुरुवातीला सिनेमाच्या कथानकावर काम सुरु करण्यात आलं आहे. सलमानच्या 'टायगर' फ्रॅंचायजी सारखं आता पठाणचे सीक्वेलही देशात नव्हे तर परदेशात गाजावाजा करतील यात शंकाच नाही.

'पठाण' सिनेमात शाहरुखसोबत दीपिका पदूकोण आहे, तर जॉन अब्राहम खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. आता लोकांमध्ये ही उत्सुकता नक्कीच निर्माण होईल की 'पठाण २' साठी बॉलीवूडमधनं कोणत्या बड्या सेलिब्रिटींना निवडलं जाईल.

याआधी अनेकदा कानावर पडतच होतं की यशराज आपल्या स्पाय युनिव्हर्सला मोठं करण्यासाठी कंबर कसून आहे. 'टायगर ३','पठाण' व्यतिरिक्त हृतिक रोशन आणि दीपिका पदूकोण यांच्या एरियल अॅक्शन सिनेमा असलेल्या 'फायटर' ला देखील स्पाय युनिव्हर्सचा एक भाग म्हटलं गेलं आहे. तर बोललं जात आहे की हृतिक आणि टायगरच्या २०१९ मध्ये आलेल्या 'वॉर' सिनेमाचं देखील कनेक्शन 'पठाण'शी असणार आहे. अनेक वर्षांनी हृतिक आणि शाहरुख एकत्र स्क्रीनवर दिसतील. आणि सलमानही त्यात दिसला तरी यात आश्चर्य वाटायला नको. कारण यांचे सर्वेसर्वा यश राज कंपनी आहे, म्हणजे ते जबरदस्त धमाका करणारच नाही का.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff : मुंबई इंडियन्स स्पर्धेबाहेर! शेवटच्या षटकात थरार अन् RCBचा रोमहर्षक विजय; POINT TABLE मध्ये अव्वल स्थानी झेप

PM मोदींमुळे भारतात तेल-गॅस मिळतोय, आवश्यकतेनुसार वापराचं आवाहन योग्यच; मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?

RCB vs MI Live: तिलक वर्माची विकेट अन् रोहित शर्मा संतापला; मुंबई इंडियन्स कसेबसे सन्मानजनक धावांपर्यंत पोहोचले Video Viral

Pune Crime: पुण्यात मोठी कारवाई; ‘एमडी’ ड्रग्ज कारखाना उघडण्याचा कट उधळला, सव्वा कोटींच्या मुद्देमालासह आठ जणांना अटक!

संकटाचा काळ! वर्षभर परदेशगमन, सोनं खरेदी करू नका; खाद्यतेलही कमी खा, मोदींनी असं आवाहन का केलं?

SCROLL FOR NEXT