Rahul Gandhi, Shahrukh Khan Esakal
मनोरंजन

Shahrukh khan Video: राहूल गांधींसमोर त्यांच्या नेतेमंडळींना शाहरुखनं दिलेला जबरी सल्ला.. म्हणालेला,'टेबलाखालून...'

शाहरुख खानचा २००८ सालचा एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. ज्यावेळी कॉंग्रेसची सत्ता होती आणि सर्व बडे कॉंग्रेसचे नेते त्या व्हिडीओत दिसत आहेत.

प्रणाली मोरे

Shahrukh khan Video: बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान आपल्या सेन्स ऑफ ह्यूमरसाठी ओळखला जातो. त्याच्याकडे प्रत्येक प्रश्नाचं चोख उत्तर असतं. एकदा राहूल गांधींनी शाहरुख खानकडे एक सल्ला मागितला,ज्याचं उत्तर देताना शाहरुख खाननं असं काही सांगितलं की त्यामुळे चाहते भलतेच खूश झाले.

२००८ मध्ये एक कार्यक्रम झाला,ज्यात कॉंग्रेस नेता राहुल गांधी यांनी अभिनेत्याला विचारलं होतं की त्याच्याकडे राजकीय नेत्यांसाठी काही सूचना आहेत का. अलिकडेच शाहरुखच्या एका चाहत्यानं एका फॅन पेजवर शेअर केलेल्या व्हिडीओत शाहरुखला तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग आणि प्रकाश जावडेकर आणि रविशंकर प्रसाद सारख्या नेते मंडळींसमोर उत्तर देताना पाहिलं जाऊ शकतं.

शाहरुखच्या उत्तरावर राजकीय नेत्यांनी देखील टाळ्या वाजवल्या. मनमोहन सिंग देखील शाहरुखच्या उत्तराचा आनंद घेत टाळ्या वाजवताना दिसत आहेत.(Shahrukh Khan Rahul Gandhi old video Viral )

व्हायरल व्हिडीओमध्ये राहुल गांधी शाहरुख खानला विचारतात,''राजकीय नेत्यांना तू काय सल्ला देशील?'' शाहरुख आधी तर हसतो आणि मग म्हणतो,''मला आनंद झाला इतका सोपा प्रश्न ऐकल्यावर''. मग तो म्हणाला,''माझं म्हणणं आहे की,सगळे राजकीय नेते एकाच ध्येयाचं,धारणेचं पालन करतील तर आपला देश खरंच खूप पुढे निघून जाईल. आणि पहा तुम्ही कोणाला प्रश्न विचारलाय. मी कधी खोटं बोलतो..कधी कुणाचा छळही करतो...आणि हे सगळं जगण्यासाठी..पोटापाण्यासाठी करतो. मी एक अभिनेता आहे,मी शो करतो,वास्तवात माझ्या वागण्याची निश्चिती देता येत नाही''.

शाहरुख खान पुढे म्हणाला,''पण तुम्हाला माहितीय की,माझ्या मनात त्या लोकांप्रती खूप सम्मान आहे जे देश चालवतात आणि ज्यांच्या मनात देश चालवण्याची इच्छा आहे. ही एक निस्वाार्थ सेवा आहे. चला,आजपासून टेबलाखालून पैसे घेऊ नका, वाईट कृत्य करू नका. जर आपण या गोष्टी योग्य पद्धतीनं करू तर आपण सगळेच पैसे कमावू, आपण सगळेच खूश राहू आणि एक महान,गौरवशाली राष्ट्र बनवू, म्हणूनच सगळ्या राजकीय नेत्यांना माझा हाच सल्ला राहिल की कृपया आयुष्यात कोणतीही गोष्ट करताना आपला ईमान सोडू नका,प्रामाणिक रहा''.

तर एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे,'ते खरंच अच्छे दिन होते,विचार करतोय पुन्हा तो काळ परत येईल का?' तर आणखी एका युजरनं लिहिलं आहे की,'आम्हाला या राजकीय नेत्यांवर गर्व आहे, भारताचा गौरव,वन अॅन्ड ओन्ली शाहरुख खान'.

आणखी एका युजरनं कमेंट करत लिहिलं आहे की,'या व्हिडीओला पाहिल्यानंतर शाहरुख खानविषयी माझ्या मनात खूप आदर निर्माण झाला आहे. तो केवळ महान अभिनेता नाही तर चांगली विचारसरणी असणारा महान व्यक्ती देखील आहे'.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: अस्वस्थ एकनाथ शिंदेंची अमित शाहांकडे नाराजी? थेट मुद्द्यालाच हात घातल्याची माहिती; इकडे फडणवीस-पवारांची गुप्त बैठक

Pune Cold : पुण्यात सलग तीन दिवस १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाची नोंद

Latest Marathi Breaking News Live Update: महापालिका निवडणुकीत ‘महाआघाडी’चे संकेत

Fact Check: बिबट्या खरंच रणजी ट्रॉफी सामन्यावेळी धरमशाला स्टेडियममध्ये घुसला? जाणून घ्या Viral Video मागचं सत्य

Akola Crime : अल्पवयीन चोरट्याकडून २१.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त; घरफोडी प्रकरणाचा वेगवान उलगडा

SCROLL FOR NEXT