Dunki Release Esakal
मनोरंजन

Dunki Release: मिचेल स्टार्कची लिलाव अन् डंकी'च्या कमाईत किती फरक? शाहरुखच्या उत्तराने नेटकऱ्याला केलं गार...

डंकीचे पहिल्या दिवसाचे कलेक्शन आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू मिचेल स्टार्कच्या लिलावात मिळालेल्या किंमतीत किती फरक यावर एक प्रश्न नेटकऱ्याने किंग खानला विचारला होता.

Vaishali Patil

Dunki Release: गेल्या काही दिवसांपासून शाहरुख खानच्या डंकी चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने प्रतिक्षा करत होते. आज अखेर शाहरुखचा डंकी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे.

आता हा सिनेमा पाहण्यासाठी चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांची मोठी गर्दी दिसून येत आहे. या दरम्यान चित्रपट रिलिजपुर्वी बुधवारी सुपरस्टार शाहरुख खानने चाहत्यांसोबत आस्क एसआरकेला सेशन आयोजित केले होते.

यामध्ये त्याला नेटकऱ्यांनी नेहमीप्रमाणे भन्नाट प्रश्न विचारली. यात एका चाहत्याने त्याला आयपीएल लिलावाशी संबंधित प्रश्न विचारला. ज्याची सध्या सोशल मिडियावर चर्चा आहे.

डंकीचे पहिल्या दिवसाचे कलेक्शन आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू मिचेल स्टार्कच्या लिलावात मिळालेल्या किंमतीत किती फरक यावर एक प्रश्न नेटकऱ्यांने किंग खानला विचारला होता. यावर किंग खानने मजेशीर उत्तर दिले आहे.

Ask SRK या सत्रादरम्यान एकाने शाहरुख खानला विचारले होते की, "डंकीची पहिल्या दिवसाची कमाई आणि मिचेल स्टार्कच्या लिलावाची किंमत यात काय फरक असेल?"

या प्रश्नाचे उत्तर देताना शाहरुख खान म्हणाला, 'भावा हा काय प्रश्न आहे?' 'डंकी' येणार, तो आधीच आला आहे!! हा हा #DunkiTomorrow.'

ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क बद्दल बोलायच झालं तर, कोलकाता नाईट रायडर्सने त्याला 24.75 कोटी रुपयांना त्यांच्या ताफ्यात घेतले. तर त्यांचा कर्णधार पॅट कमिन्सला सनरायझर्स हैदराबादने तब्बल 20 कोटी रुपयांना विकत घेतले.

दुबईत मंगळवारी झालेल्या या लिलावात 'इंडियन प्रीमियर लीग'मध्ये इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू म्हणूनमिचेल स्टार्कची नोंद झाली.

तर शाहरुखच्या डंकी बद्दल बोलायचे झाले तर, यामध्ये शाहरुख खानसह बोमन इराणी, तापसी पन्नू, विकी कौशल, विक्रम कोचर, अनिल ग्रोव्हर यांसारखी तगडी स्टारकास्ट आहे.

या चित्रपटाची निर्मिती JIO स्टुडिओ, रेड चिलीज एंटरटेनमेंट आणि राजकुमार हिरफिल्म्स आणि राजकुमार हिरानी आणि गौरी खान यांनी केली आहे.

'डंकी' ही खऱ्या आयुष्यावर आधारित प्रेम आणि मैत्रीची कथा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India vs Sri Lanka Test Series: भारत-श्रीलंका कसोटी मालिकेची तारीख जाहीर; WTC Final साठी दोन महत्त्वाचे सामने केव्हा व कुठे?

सायलीचं आहे खरी तन्वी, सुभेदारांसमोर येणार सगळ्यात मोठं सत्य, 'ठरलं तर मग'चा शेवट सुरू?

Latest Marathi News Live Update : मुंबईतील मॅनहोल दुर्घटनेवर अंबादास दानवेंची टीका; "मृत्यूसाठी महापालिकाच जबाबदार"

VTU Result 2026: इतिहास घडला! परीक्षा संपताच अवघ्या ५ मिनिटांत 'व्हीटीयू'चा अभियांत्रिकीचा निकाल जाहीर; ६० हजार विद्यार्थ्यांना दिलासा

Maharashtra Government RTI : माहिती अधिकार कायद्यात बदल होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचा पुढाकार, अण्णा हजारेंच्या इशाऱ्यानंतर सरकारची नरमाई

SCROLL FOR NEXT