shahrukh khans lead Dunki:Important person leaves project due to creative differences with director.
shahrukh khans lead Dunki:Important person leaves project due to creative differences with director. Google
मनोरंजन

शूटिंग अर्धवट सोडून शाहरुखच्या 'डंकी' मधून महत्त्वाच्या व्यक्तीची एक्झिट

प्रणाली मोरे

सुपरस्टार शाहरुख खानने(Shah rukh Khan) आपल्या चाहत्यांना खूप दिवस आपली वाट पहायला लावली आहे. २०१८ साली त्याचा 'जीरो' सिनेमा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झालेला शेवटचा सिनेमा. आता तो पूर्ण ५ वर्षानंतर पडद्यावर परत दिसणार आहे. 'पठाण' सिनेमाच्या माध्यमातून तो पुन्हा सिल्व्हर स्क्रीन गाजवायला येत आहे. याव्यतिरिक्त शाहरुख खानने आणखी काही आपल्या सिनेमांच्या घोषणा केल्या आहेत. यामध्ये त्याचा मल्टिस्टारर सिनेमा 'डंकी' चा देखील समावेश आहे. पण आता बातमी आहे की, सिनेमाच्या टीममध्ये वादाची ठिणगी पडली असून अंतर्गत कलह निर्माण झाले आहेत.(shahrukh khans lead Dunki:Important person leaves project due to creative differences with director).

'लव्ह आज कल २','सरकार','सरकार राज' सारख्या सिनेमांचा भाग राहिलेला अमित राय शाहरुख खान आणि तापसी पन्नूच्या 'डंकी'(Dunki) सिनेमाचा डीओपी म्हणून काम पाहत होता. मात्र आता बातमी आहे की,अमित रॉयनं म्हटलं आहे,''मी आता 'डंकी' वर काम करत नाही. मी १८-१९ दिवसांचे शूटिंग पूर्ण केले आहे आणि मग या सिनेमाचे काम सोडले आहे''.

अमित रॉय म्हणाला की,''राजकुमार हिरानी आणि माझ्या मध्ये क्रिएटिव्ह डिफरन्सेस होते. एकाच फ्रेमला पाहण्याचा आमचा दृष्टिकोन हा वेगळा होता,आमचं एकमत व्हायचं नाही. पण आम्ही खूप चांगल्या पद्धतीनं वेगळे झाले आहोत. माझ्यामुळे काही अडचणी निर्माण होऊ नयेत एवढाच माझा हेतू होता. त्यामुळे आम्ही एकत्र मिटींग केली,चर्चा केली आणि एका चांगल्या नोटवर मी सिनेमातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला''.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sam Pitroda: पित्रोदांच्या विधानावरुन PM मोदींचं तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान; म्हणाले, युती...

SRH vs LSG Live Score : तिसऱ्या स्थानासाठी हैदराबाद अन् लखनौ भिडणार

पूंछमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचे फोटो समोर, पाकिस्तानशी थेट कनेक्शनची शक्यता

High Court : ''मुस्लिमांना लिव्ह-इन-रिलेशनशीपमध्ये राहण्याचा अधिकार नाही'', हायकोर्टाने नेमकं काय म्हटलं?

Pankaja Munde Audio: "पंकजा मुंडेंच्या ऑडिओ क्लीपची चौकशी करा"; बजरंग सोनावणेंची निवडणूक आयोगाकडं मागणी

SCROLL FOR NEXT