Shalin Bhanot And Archana Gautam argument Over Chicken. Big Boss 16 Google
मनोरंजन

Big Boss 16: 'इथे खायला आला आहेस की खेळायला?', शालीनवर भडकली अर्चना गौतम

बिग बॉस च्या घरात शालीन भानोतच्या चिकनवरुन महाभारत रंगलेलं पहायला मिळालं.

सकाळ डिजिटल टीम

Big Boss 16: सर्वात लोकप्रिय रिअॅलिटी शो 'बिग बॉस 16' हिंदी सतत चर्चेत असतो. प्रत्येक एपिसोडमध्ये स्पर्धकांमध्ये प्रचंड वाद आणि अटीतटीची स्पर्धा पाहायला मिळते आहे. सध्या बिग बॉसच्या घरात बरेच काही घडत आहे. पण आता काहीतरी वेगळंच पहायला मिळत आहे. बिग बॉसच्या प्रोमो मध्ये शालीन बिग बॉसच्या घरात चिकनसाठी चिंतेत दिसत आहे. आणि यावरुन शालीनला बिग बॉस फटकारताना दिसत आहेत.(Shalin Bhanot And Archana Gautam argument Over Chicken. Big Boss 16)

शालीन भानोत बिग बॉसच्या घरात प्रवेश केल्यापासून नेहमीच चिकनची मागणी करताना दिसतो. शालीनचे म्हणणे आहे की प्रकृतीच्या स्थितीमुळे त्याच्या शरीराला प्रोटीनची गरज आहे. शालीनची तब्येत लक्षात घेऊन बिग बॉस त्याच्यासाठी रोज चिकन पाठवतात. पण आता झालेल्या टास्कनंतर घरात चिकन आलेले नाही. यानंतर त्याने बिग बॉसकडे चिकनची मागणी केली.

शालीनला दुःखी पाहून बिग बॉसने त्याला बोलण्यासाठी बोलावले. प्रोमोमध्ये बिग बॉस शालीनला घराच्या गरजेनुसार चिकन पाठवल्याचे सांगतांना दिसत आहे , आणि आणखी चिकन येणार नाही हे देखील सांगतात. अर्चना गौतमला शालीनच्या या वृत्तीचा खूप राग येतो आणि ती म्हणते की 'तु खेळायला आला की चिकन खायला? आधी याला घरी पाठवा. दुसरीकडे, टीना दत्ता शालीनला शांत राहण्याचा सल्ला देत आहे. शालीन आता हा चिकनचा मुद्दा कुठे घेऊन जातो हे पाहावे लागेल.

एवढेच नव्हेतर सोशल मीडियावरही शालीनची खिल्ली उडवली जात आहे. तो शोमध्ये चिकन खाण्यासाठी की खेळण्यासाठी आला आहे, इतकं चिकन तू कधी घरात तरी खाल्ले आहेस का? असा सवाल आता नेटकरीही विचारू लागलेयत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: धक्कादायक! वादानंतर पत्नीचा पारा चढला, रागाच्या भरात पतीच्या प्राइवेट पार्टवर ब्लेडने वार अन्...; नेमकं काय घडलं?

Vasai Protest : महावितरणच्या दुर्लक्षामुळे नंदाखाल परिसरात वीज पुरवठा खंडित, संघर्ष समितीचा आक्रोश

Latest Marathi News Live Update : चांदवडला काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक

Mumbai News: गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग, किनारी रस्ता प्रकल्पाला गती द्यावी; पालिका आयुक्तांचे निर्देश

CM Adityanath Mobile Number: अधिकारी काम करत नाहीत? CM योगींकडे करा थेट तक्रार! मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचा मोबाईल नंबर

SCROLL FOR NEXT