Bigg Boss 16 Grand Finale Sakal
मनोरंजन

Bigg Boss 16 Finale: शालिन भनोट आणि अर्चना गाैतम यांचा बिग बाॅसमधील प्रवास संपला?

शालिन भानोतला पाचव्या क्रमांकावर शोमधून बाहेर काढण्यात आले आहे आणि आता तो बाहेर पडल्यानंतर बक्षिसाची रक्कमही वाढली आहे.

सकाळ डिजिटल टीम

'बिग बॉस 16' मध्ये सुरुवातीपासूनच आपली भक्कम बाजू दाखवणाऱ्या शालिन भानोतच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर येत आहे. टॉप 5 फायनलिस्टमध्ये आपले स्थान पक्के करणाऱ्या शालीनला पुढे जाता आलेले नाही. अलीकडील रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की शालीनला शोमधून बाहेर काढण्यात आले आहे.

तसेच अर्चना गाैतमला देखील शोमधून बाहेर काढण्यात आले आहे असा दावा केला जात आहे. अर्चनाला चौथे स्थान मिळाले ज्यानंतर तिला घरातून बाहेर काढावे लागले.अर्चना गाैतम हिने संगीत खुर्चीमध्ये विजय मिळवला आहे. यामध्ये शिव ठाकरे याला अर्चना गाैतम हिने हारवले आहे. संगीत खुर्चीचा टास्क अर्चना गाैतम हिने जिंकला आहे.

वृत्तानुसार, शालिन भानोतला पाचव्या क्रमांकावर शोमधून बाहेर काढण्यात आले आहे आणि आता तो बाहेर पडल्यानंतर बक्षिसाची रक्कमही वाढली आहे. आता 'बिग बॉस' या रिअॅलिटी शोमध्ये शिव, प्रियांका आणि स्टेन यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळत आहे.

शालीन कडून चाहत्यांना खूप आशा होत्या, तो येणाऱ्या दिवसात चर्चेत असायचा, पण शालीनचे असे शेवटच्या स्थानावर येणे त्याच्या मित्रांसाठी धक्कादायक आहे. शालीनला घरातून बाहेर काढताच बक्षिसाची रक्कम 31 लाखांपर्यंत वाढली आहे.

'बिग बॉस'मध्ये राहत असताना शालिनचे नाव 19 वर्षीय सुंबूल तौकीर खानसोबत जोडले गेले. या दोघांच्या जवळीकीने सोशल मीडियावर बरीच चर्चा केली. दोघांना एकत्र पाहून लोकांनी खूप ट्रोलही केले. पण नंतर त्यांचे मार्ग वेगळे झाले.

सुंबुलनंतर शालीनचे नाव टीना दत्तासोबत जोडले गेले आणि दोघेही खूप रोमँटिक अंदाजात दिसले, पण त्यांचे नातेही फार काळ टिकले नाही. नंतर टीना आणि शालीनमध्ये एवढी भांडणे झाली की दोघांनी एकमेकांचे तोंडही पाहण्यास नकार दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rani Mukherjee Mother Death: अभिनेत्री राणी मुखर्जीला मातृशोक! कृष्णा मुखर्जींचं निधन, कुटुंबावर दुःखाचा डोंगर

Asian Games 2026 Medal Table: भारतीय महिलांच्या 'Gold' ने पदकतालिकेत उलथापालथ, १२ व्या स्थानावर असलेलो आपण थेट पोहोचलो...

Supreme Court: एससी-एसटी कायद्यातील तरतुदींना आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली; नेमकं प्रकरण काय?

Numerology: लहान मुलांचा हट्टीपणा अन् जन्म तारीख; 'या' ३ मूलांकांची मुले असतात प्रचंड हट्टी! पाहा काय सांगते अंकशास्त्र...

Vishakha Raut: विशाखा राऊतांना दिलासा, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; प्रिया सरवणकरांच्या नियुक्तीला ब्रेक

SCROLL FOR NEXT