Shalin Bhanot and Rohit Shetty Sakal
मनोरंजन

Bigg Boss 16: शालिन भानोतला हा निर्णय पडणार महागात? रोहित शेट्टीची मोठी ऑफर सर्वांसमोर नाकारली

बॉलीवूड दिग्दर्शक आणि खतरों के खिलाडी शोचा होस्ट रोहित शेट्टी गेल्या शुक्रवारच्या भागात आला होता. रोहित त्याच्या शोचा पहिला स्पर्धक शोधण्यासाठी शोमध्ये गेला होता.

सकाळ डिजिटल टीम

कलर्स टीव्हीचा सर्वात प्रसिद्ध शो बिग बॉस आता शेवटच्या टप्प्यात आला आहे. शोचा ग्रँड फिनाले आज होणार आहे. 16व्या सिजमधील विजेत्याची घोषणाही अंतिम फेरीतच केली जाईल.

यापूर्वी, बॉलीवूड दिग्दर्शक आणि खतरों के खिलाडी शोचा होस्ट रोहित शेट्टी गेल्या शुक्रवारच्या भागात आला होता. रोहित त्याच्या शोचा पहिला स्पर्धक शोधण्यासाठी शोमध्ये गेला होता.

बिग बॉसच्या या सीझनच्या शेवटच्या शनिवारी रोहित शेट्टीने घरात उपस्थित स्पर्धकांना वेगवेगळी टास्क करायला लावली होती. अनेक टास्कनंतर रोहित शेट्टीने विजेत्याची घोषणा केली.

यामध्ये शालीन भानोतने सर्वांना आश्चर्यचकित केले आणि सर्वात लवकर टास्क पूर्ण केले. मात्र, जेव्हा रोहित शेट्टीने त्याला खतरों के खिलाडी या शोचा पहिला स्पर्धक बनवले तेव्हा त्याने नकार दिला.

शालीन भानोतने सांगितले की, मला रोहित शेट्टीसोबत त्याच्या चित्रपटात काम करायचे आहे. तो म्हणाला की मला खतरों के खिलाडीमध्ये जायचे नाही. मी हे टास्क मोठ्या उत्साहाने केले कारण मला तुमच्यासोबत चित्रपट करायचा आहे.

यावर रोहित शेट्टी म्हणाला की, चित्रपट नंतर करू, पहिले खतरों के खिलाडी. पण शालीनने रोहित शेट्टीसमोर शोमध्ये सहभागी होण्यास नकार दिला.

सलमान खानच्या या हिट टीव्ही शोमध्ये यावेळी पाच कॉन्स्टंट्स ग्रँड फिनालेमध्ये पोहोचले आहेत. यामध्ये शालीन भानोत, प्रियांका चहर चौधरी, एमसी स्टेन, शिव ठाकरे आणि अर्चना गौतम यांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अभिजीत दीपकेंना विचारलं- देशाचा बेस्ट PM कोण? क्षणाचाही विलंब न करता घेतलं 'या' नेत्याचं नाव; बेस्ट CM साठी घेतली तीन नावं

Bidkin News: बिडकीनच्या DMIC हद्दीत अज्ञात महिलेचा संशयास्पद मृतदेह; घातपाताचा संशय, पोलिस तपास सुरू

CNG-PNG महागणार? शेणापासून तयार होणाऱ्या CBG ची किंमत वाढली; ग्राहकांच्या खिशावर कसा परिणाम होणार?

Amravati Hospital Fire : निधी नव्हता म्हणून फायर ऑडिटला विलंब, अमरावतीतील रुग्णालयाबाबत धक्कादायक माहिती समोर

Pune Court: न्यायसेवेतील प्रदीर्घ अनुभव पुण्याच्या न्यायालयाच्या कामी; अंजू शेंडे यांनी स्वीकारला प्रमुख न्यायाधीशपदाचा पदभार

SCROLL FOR NEXT