maadhvi nemkar, sukh mhanje nakki kay asta SAKAL
मनोरंजन

Maadhvi Nemkar: आणि काळजाचा ठोका चुकला.. पहिल्या मजल्यावरून शालिनीचा भन्नाट स्टंट.. व्हिडिओ व्हायरल

माधवीला घराच्या पहिल्या मजल्यावरून खाली साडीचा आधार घेऊन उडी मारायची होती

Devendra Jadhav

Sukh Mhanje Nakki Kay Asta: स्टार प्रवाहवरील सुख म्हणजे नक्की काय असतं मालिका प्रेक्षकांची फेव्हरेट आहे. हि मालिका गेली अनेक वर्ष TRP च्या शिखरावर आहे. मालिकेतील सर्वच कलाकारांवर प्रेक्षक भरपूर प्रेम करतात.

मालिकेतील खलनायिका असलेली शालिनी म्हणजेच अभिनेत्री माधवी नेमकरचं सोशल मीडियावर प्रचंड फॅन फॉलोईंग आहे. मालिकेतल्या भूमिकेसाठी माधवी काय करू शकते याचा एक मोठा व्हिडिओ समोर आलाय.

(actress maadhvi nemkar amazing stunt from the first floor)

माधवीला घराच्या पहिल्या मजल्यावरून खाली साडीचा आधार घेऊन उडी मारायची होती. आधी शिडीवर चढून माधवी साडीचा आधार घेऊन पत्र्यावर चढली. पत्रा निसरडा होता. याच पत्र्यावरुन शॉट सुरु झाल्यावर माधवीला खाली उतरायचं होतं. शिडी काढण्यात आली. आसपास कोणीही सहारा द्यायला नव्हतं. माधवीला ऍक्शन म्हटल्यावर एकटीला हा स्टंट पूर्ण करायचा होता.

शॉट सुरु झाल्यावर माधवी हळूहळू स्वतःचा जीव मुठीत घेऊन निसरड्या पत्र्यावरुन खाली उतरली. पुढेही साडीचा आधार घेऊन माधवी हळहळू खाली उतरली. आणि एके क्षणी तिने उडी मारली आणि ती खाली पडली. पुढे लंगडत पायाने माधवीने तिचा शॉट पूर्ण केला. माधवी तिच्या कामासाठी जे डेडिकेशन दाखवत आहे, त्याचं सर्वांनी कौतुक केलंय.

शालिनी फेम माधवीने हा व्हिडिओ शेयर करताना खास कॅप्शन लिहिलं आहे. माधवी लिहिते,"शेवटी.. तुम्ही जे काम करताय त्याचं फळ तुम्हाला मिळेलच.. हे फळ कधी तुम्हाला एका वर्षात मिळते किंवा कधी त्यासाठी 30 वर्षही लागू शकतात.. पण कधी ना कधी तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल... मी जे करत आहे आणि शिकत आहे ते मला आवडतेय" अशी पोस्ट माधवीने शेयर केलीय

सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेने नुकतेच ७०० भाग पूर्ण केले आहेत. या मालिकेत माधवी नेमकर सोबतच गिरीजा प्रभू, मंदार जाधव, वर्षा उसगावकर असे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत.

सोम ते शुक्रवार रात्री ९:३० वाजता हि मालिका स्टार प्रवाहवर सुरु आहे. मालिकेत माधवी नेमकर साकारत असलेल्या शालिनी या भूमिकेला आजवर अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed Railway: बीडकरांची ४० वर्षांची स्वप्नपूर्ती! उद्यापासून अहिल्यानगर ते बीड 'रेल्वे'सेवेला सुरुवात; काय आहेत वैशिष्ट्ये?

Maratha Reservation: १९९४ चा जीआर नेमका काय आहे? मराठा समाज आरक्षणाबाहेर राहिला, कारण...

Latest Marathi News Updates: भाजपमध्ये घराणेशाही नाही- देवेंद्र फडणवीस

Pachod News : चौकशीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांच्या धमकीने घाबरलेल्या शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन संपविले जीवन

कोकणातलं तुम्हाला काय आवडलं? दिलीप प्रभावळकर म्हणाले, 'ते पाहून मीच चकीत झालो कारण...

SCROLL FOR NEXT