Shama Sikander said about the child after marriage, which needs a big heart to say Google
मनोरंजन

'माझी मुलं गे किंवा लेस्बियन..' शमा सिकंदर पुढे जे बोलली त्याला मोठं मन हवं

छोट्या पडद्यावरची हॉट अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शमा सिकंदरनं १४ मार्च २०२२ रोजी जेम्स मिलिरॉनसोबत गोव्यात लग्न केलं आहे.

प्रणाली मोरे

छोट्या पडद्यावरची हॉट अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शमा सिकंदरनं (Shama Sikander) काही दिवसांपूर्वीच आपल्या बॉयफ्रेंडसोबत मोठ्या धूमधडाक्यात लग्न केलं. १४ मार्च २०२२ रोजी तिनं जेम्स मिलिरॉनसोबत गोव्यात लग्न(Marriage) केलं आहे. लग्नानंतर शमानं आपल्या नवीन वैवाहिक आयुष्या संदर्भात बोलताना होणाऱ्या मुलांविषयी देखील मोठं वक्तव्य केलं आहे. ती म्हणाली आहे की,''लग्नानंतर तिच्या आयुष्यात फार बदल झालेला नाही. पण मुलांविषयी तिनं जे सांगितलं ते मात्र आजपर्यंत कोणीच म्हटलेलं आपण ऐकलं नसेल. (Shama Sikander Said about the child after marriage, which needs a big heart to say)

शमा सिकंदर म्हणाली,''लग्नानंतर माझ्या आयुष्यात मोठा बदल वगैरे झालेला नाही. कारण आम्ही ८ वर्षांपासून एकत्र राहत आहोत,पण हो एक छोटा आणि महत्त्वाचा बदल मात्र नक्कीच झाला आहे. कारण जेव्हा आमचं लग्न होतं होतं तेव्हा आम्ही लग्नाच्या ज्या विधी पार पाडत होतो त्या साकारताना मनाला एक उर्जा मिळत होती सकारात्मकतेची,जणू बळ दुपटीनं वाढतंय असं वाटत होतं. प्रेम,आनंद या भावनांनी केवळ मन नाही तर सारं वातावरण प्रफुल्लित झालं होतं. जेव्हा दोन मनापासून प्रेम करणारे लोक एकत्र येऊन सेलिब्रेशन करतात तेव्हा ते आपल्या सभोवतालचं जगही बदलून टाकतात त्यांच्या पॉझिटिव्ह विचारांनी. माझं आयुष्य त्या अनुषंगाने नक्कीच बदललंय असं मी म्हणेन. आणि हो आता मी थोडी जबाबदार झालेय''.

''ज्याच्यावर प्रेम केलं त्याच्याशीच लग्न यापेक्षा दुसरा आनंद काय आणि तो दिवस आपल्या प्रियजनांच्या,नातेवाईकांच्या,मित्रपरिवाराच्या साथीनं अनुभवणं हा परमोच्च आनंद देणारा क्षण. कोरोनामुळे लग्न २ वर्ष उशीरा केलं. पण जे झालं ते चांगलं झालं कारण आम्ही आणखी एकमेकांना चांगले ओळखू लागलो''.

ती पुढे म्हणाली,''मी खूप चांगली आई बनेन . एका इंग्रजी वृत्तपत्रानं लिहिलं होतं शमाला आई बनण्यासाठी लग्न करायची गरज नाही. पण मला वाटतं मुलाला जन्म देणं ही खूप मोठी जबाबदारी आहे. तुम्ही आपल्या आयुष्यात सेटल हवात. जेणेकरुन मुलांचे संगोपन तुम्ही चांगलं कराल. मी आता माझ्या आयुष्याच्या अशा टप्प्यावर आहे जिथे मला वाटतं की मी माझ्या मुलांना चांगलं आयुष्य देईन''.

पुढे शमानं जे म्हटलं ते तुम्हाला आश्चर्य वाटायला नक्कीच भाग पाडेल. ती म्हणाली, ''मुलगा असो की मुलगी,ते गे असोत की लेस्बियन मला फरक पडत नाही. मला मुलं हवी आहेत पण त्यांना जन्म कधी द्यायचा, किंवा कोणाला जन्म दिलाय हे आमचं सीक्रेट आहे. मी यासंदर्भात बोलणं योग्य समजणार नाही. मला तर मुलं दत्तक घ्यायची होती पण कुणी मला दिलीच नाही ती संधी. पण मला वाटतंय मला जरी मुलं झाली तरी मी त्यानंतर मुल दत्तक घेण्याचा विचार नक्कीच करेन. मला मुलं खूप आवडतात. शमाचे मुलांसंदर्भातले हे विचार चांगलेच आहेत पण सध्या मात्र चर्चा रंगलीय ते आपली मुलं गे किंवा लेस्बियन असली तरी चालतील,मला फरक पडणार नाही या शमाच्या वक्तव्यामुळे''.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसाल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Solapur News: सोलापूरकरांना महागाईचा आणखी एक झटका! १ जुलैपासून कटिंग १३०, दाढी ७० रुपये; नाभिक संघटनेची १०% दरवाढ

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Paud Agriculture Day: पौड येथे कृषी दिन उत्साहात साजरा; वसंतराव नाईक जयंतीनिमित्त शेतकरी सन्मान व योजनांवर मार्गदर्शन

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

SCROLL FOR NEXT