Shamita Shetty Sakal
मनोरंजन

Shamita Shetty: 'मी आनंदी...', आमिर अलीसोबत डेटिंगच्या अफवांवर शमिता शेट्टीने सोडले मौन

अलीकडेच शमिता शेट्टीचे नाव टीव्ही अभिनेता आमिर अलीसोबत जोडले जात आहे.

सकाळ डिजिटल टीम

टीव्ही रिअ‍ॅलिटी शो 'बिग बॉस 15' फेम आणि बॉलिवूड अभिनेत्री शमिता शेट्टी पुन्हा एकदा डेटिंगमुळे चर्चेत आली आहे. अलीकडेच शमिता शेट्टीचे नाव टीव्ही अभिनेता आमिर अलीसोबत जोडले जात आहे. तूर्तास, अभिनेत्रीने ट्विटरवर एकामागून एक ट्विट करून हे वृत्त फेटाळून लावले आहे.

अलीकडेच सोशल मीडियावर शमिता शेट्टी आणि आमिर अलीसोबत स्पॉट झाले होते. दोघेही खूप जवळ दिसले. आमिर अलीने गेल्या वर्षीच पत्नी संजीदा शेखपासून घटस्फोट घेतला होता. अशा परिस्थितीत अभिनेत्याची शमितासोबतची जवळीक पाहून लोकांनी अफेअरच्या बातम्या उडवून दिल्या आहेत. एका व्हिडिओमध्ये आमिर शमिताच्या गालावर किस करताना दिसत होता. यामुळे इंटरनेटवर डेटिंगच्या अफवा पसरल्या.

आता शमिताने ट्विटरवर अनेक ट्विट करत या वृत्तांचे खंडन केले आहे. अभिनेत्रीने लिहिले की ती सध्या 'सिंगल आणि आनंदी' आहे आणि लोकांनी 'छोट्या विचारांचे असू नये. शमिताने ट्विटरवर लिहिले की, "मी समाज आणि त्याच्या सोयीस्कर मानसिकतेला कंटाळले आहे. प्रत्येकजण चौकशी न करता आणि सत्य जाणून घेतल्याशिवाय कोणत्याही गोष्टीवर निकाल देण्यासाठी जज का बनले आहे? NETIZENS च्या छोट्या विचारांच्या पलीकडे बरेच काही आहे."

इतकेच नाही तर तिने पुढे लिहिले की, "याबद्दल आपले मन मोकळे करण्याची वेळ आली आहे! सिंगल आणि आनंदी.. या देशातील आणखी गंभीर समस्यांवर लक्ष केंद्रित करूया".

तिचे चाहते उघडपणे शमिताला पाठिंबा देताना दिसत आहेत. एका चाहत्याने उत्तर दिले, "हे फक्त बकवास आहे, एक सामान्य किस नातेसंबंधाची पुष्टी करू शकत नाही." दुसऱ्या युजरने लिहिले की, "शमिता काळजी करू नकोस, आम्ही तुझ्यासोबत आहोत."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Cold Wave : पुणे गारठले! पारा ९.४°C वर; तीन वर्षांतील विक्रमी नीचांकी तापमानाची नोंद, पुणेकरांना हुडहुडी!

Latest Marathi Breaking News Live Update : इंदिरानगरमध्ये भोंदू बाबाचा घोटाळा उघड: महिलेला धमक्या देत ५० लाखांची फसवणूक

'या' प्रश्नाचं उत्तर देऊन सुष्मिता सेनने जिंकलेला मिस युनिव्हर्सचा ताज; काय होता तो प्रश्न? तुम्ही काय उत्तर दिलं असतं?

Pisces Love Horoscope 2026: 2026 मध्ये मीन राशीचं प्रेम कोणतं वळण घेणार? शनी सांगतो तुमचं वार्षिक राशीभविष्य

'उर्मिला कानेटकरचं जागी मला विचारण्यात आलं...' घासीराम कोतवाल या हिंदी नाटकात आशिष पाटीलची लावणी, साकारतोय 'गुलाबी' हे पात्र

SCROLL FOR NEXT