raj kundra,shamita shetty file image
मनोरंजन

शमिता शेट्टीने सांगितलं 'बिग बॉस'मध्ये सहभागी होण्यामागचं खरं कारण

शमिताची बहीण शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा सध्या न्यायालयीन कोठडीत

प्रियांका कुलकर्णी

छोट्या पडद्यावरील सर्वांत चर्चेत असणारा शो म्हणजे 'बिग बॉस'. या शोच्या नव्या पर्वाची नुकतीच सुरूवात झाली. 'बिग बॉस ओटीटी' असं या नव्या सिझनचं नाव आहे. या सिझनच्या काही एपिसोडचे सूत्रसंचालन बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहर (karan johar) करणार आहे. या पर्वात तीन आठवड्यांसाठी 13 स्पर्धक सहभागी होणार आहेत. या शोची पहिली स्पर्धक म्हणून शिल्पा शेट्टीची (shilpa shetty) बहीण शमिता शेट्टीने (shamita shetty) एन्ट्री केली. पॉर्नोग्राफी प्रकरणात शिल्पाचा पती राज कुंद्रा (raj kundra) न्यायालयीन कोठडीत आहे. बिग बॉसमध्ये शमिताला पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

शमिताने सांगितले बिग बॉसमध्ये सहभागी होण्याचे कारण

बिग बॉस ओटीटीची पहिली स्पर्धक म्हणून एन्ट्री करताना शमिता म्हणाली, 'वेळ चांगली किंवा वाईट कशी ही असो, आपण श्वास घेणं तर सोडत नाही. तसंच आपण कामसुद्ध करत राहिलं पहिजे. बिग बॉस शोची ऑफर मला खूप आधी आली होती आणि मी त्यांना कमिटमेंट दिली होती. मी एकदा कमिटमेंट दिली की मागचापुढचा फारसा विचार करत नाही.' शमिताचे हे बोलणे ऐकून करण तिला म्हणाला, 'वाईट वेळ विसरून चांगल्या गोष्टींची वाट पाहुयात'

शमिताने 2009 मध्ये बिग बॉसच्या तिसऱ्या सिझनमध्ये भाग घेतला होता. आता पुन्हा बिग बॉसमध्ये तिला पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. बिग बॉस ओटीटीमध्ये स्पर्धकांच्या जोड्या करण्यात आल्या आहेत. शमिताची जोडी ही प्रसिद्ध अभिनेता राकेश बापट याच्यासोबत करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Israel-Iran War: इस्राईलचं सैन्य लेबनॉनमध्ये घुसलं! ‘हिज्बुल्लाह’ विरोधात आक्रमक भूमिका; नागरिकांना स्थलांतराचे आवाहन

Pune News : भांडार विभाग साहित्य खरेदी प्रकरणातील आठ अधिकाऱ्यांकडून खुलासा करण्यास टाळाटाळ

Iran america Israel war : इराण-अमेरिका-इस्त्राईल संघर्ष तिव्र होण्याची शक्यता; मध्यपूर्वेतील युद्धाचा भडका उडण्याची चिन्हे

Iran-Israel war: 'आता ती वेळ आलीच...', शहबाज-मुनीर यांच्याविरोधात पाकिस्तानमध्ये जनक्षोभ, २६ जणांचा मृत्यू

होळीच्या रंगांवर काळी सावली; नागपूरमध्ये किरकोळ वादातून तरुणाचा मृत्यू, गाडी साईडने चालव म्हणणं जीवावर बेतलं

SCROLL FOR NEXT