Shamita Shetty will get marry Rakesh Bapat this Year 
मनोरंजन

'मला संसार करायचाय?' राकेशसोबत शमिता लवकरच अडकणार लग्नबंधनात

सकाळ डिजिटल टीम

बहूचर्चित आणि वादग्रस्त टेलिव्हिजन रियालिटी शो बिग बॉसचे (big boss) १५ वे पर्व नुकतेच संपले. या पर्वात दिसलेली अभिनेत्री शमिता शेट्टी (Actress Samita Shetty) लवकरच विवाह बंधनात(Marriage) अडकणार आहे. नुकताच तिने आपला ४३ वाढदिवस साजरा केला. आपल्या लग्नाबाबत तिने बिनधास्तपणे संवाद साधला.

गेल्या काही दिवासांपासून बॉलिवूडमध्ये (bollywood) एकापाठोपाठ एक लग्न होत आहे. फिल्म इंडस्ट्रीपासून ते टिव्ही इंटस्ट्रीतील कित्येक कपल (Couple) विवाह बंधनात अडकले आहेत. दरम्यान, या लग्नसराईच्या काळात शमिता शेट्टीने देखील लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. तिने याबाबत नुकताच एक इंटरव्ह्यूमध्ये खुलासा केला की, ''आता ती लग्न करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे.'' (Shamita Shetty will get marry Rakesh Bapat this Year)

आपल्या दमदार खेळीने लोकांचे मन जिंकणार बॉलीवूड अभिनेत्री शमिता शेट्टी गेल्या काही दिवसांपासून अभिनेता राकेश बापट(Rakesh Bapat) सोबतच्या नात्यामुळे चर्चेत आली आहेत. शमिता बिगबॉस १५ पर्वच्या आधी बिगबॉस ओटीटीमध्ये देखील दिसली होते. राकेश बापटे देखील बिगबॉस ओटीटीचा हिस्सा होता. शमिता आणि राकेशची भेट या रिअॅलिटी शो दरम्यान झाली आणि त्यांच्या मैत्रीचे हळू हळू प्रेमात रुपांतर झाले.

नुकत्याच एका इंटरव्ह्यू दरम्यान राकेशसोबत आपल्या नात्याबाबत आणि लग्नाबाबत बोलताना शमिताने मोकळेपणाने संवाद साधला. तिने सांगितले की, ''लवकरच तिला राकेशसोबत लग्न करायचे आहे.'' याबाबत विशेष गप्पा मारताना अभिनेत्रीने सांगितले की, ''राकेशसोबत नात्यामध्ये मी आनंदी आहे. या वर्षी मी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.''

तिने सांगितले की, ''माझ यंदा लग्न होणार आहे आणि त्यासाठी देवाचा आर्शिवाद मला हवा आहे.'' दरम्यान ती म्हणाली, लॉकडाऊन आणि कोरोना काळामध्ये माला जाणवले की, मी किती एकटी आहे. मी बऱ्याच काळापासून सिंगल आहे आणि आतापर्यंत मी माझे आयुष्य माझ्या हिशोबाने जगले आहे.''

Shamita Shetty will get marry Rakesh Bapat this Year

अभिनेत्रीने सांगितले की, ''याआधी मला जोडीदार भेटला नव्हता, पण आता मी आनंदी आहे की माझ्यासोबत कोणीतरी आहे. आता मला हे बघायचे आहे हे नाते किती काळ टिकेल पण, मला आता संसार करायचा आहे आणि आपले कुटुंब पुढे न्यायचे आहे.'' शमिताने राकेशसोबत आपल्या नात्याबाबत मनमोकळ्या गप्पा मारल्या.

शमिनाताने सांगितले की, ''बिगबॉस १५ दरम्यान मी राकेशपासून लांब होते. त्यामुळे मी हाच विचार करत होते की, राकेश अजूनही माझा बॉयफ्रेंड आहे. मला वाटले की, ३-४ महिन्यांमध्ये लोक बदलण्याची शक्यता असते. त्यामुळे मी सर्वांना विचारत होती, की तो अजूनही माझा बॉयफ्रेंड आहे की तो आयुष्यात पुढे गेला आहे. मला समजत नव्हते की, तो जर आयुष्यात पुढे गेला तर मी काय करू?''

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Session: तुकडेबंदी कायदा रद्द! पुढे कशी असेल कार्यप्रणाली? 'त्या' जमिनींना नियमातून वगळले

PKL 12: प्रो कबड्डी लीगच्या १२ व्या हंगामाला 'या' दिवशी होणार सुरूवात! १२ संघांमध्ये पुन्हा रंगणार थरार

Latest Maharashtra News Live Updates: 'राजद'च्या दबावाखाली, काँग्रेसने पप्पू यादव अन् कन्हैया कुमारचा जाहीर अपमान केला - संजय निरुपम

Hemlata Thackeray: मराठवाडा विद्यापीठाच्या उपकुलसचिव हेमलता ठाकरेंचा जीवन संपवण्याचा प्रयत्न; सुसाइड नोटमध्ये लिहिलं...

Guru Purnima : गुरु नसेल तर गुरु पौर्णिमेला कुणाची करावी पूजा? ; शास्त्र काय सांगते, जाणून घ्या!

SCROLL FOR NEXT