Shane Warne(Australian Former Cricketer) Googl
मनोरंजन

शेर्न वॉर्नवर बायोपीक;सिनेमा बॉलीवूडचा,मात्र अभिनेता हॉलीवूडचा

शेर्न वॉर्ननं बॉलीवूडच्या या सिनेमासाठी परवानगी दिली होती,मात्र काही अटी घातल्या होत्या.

प्रणाली मोरे

ऑ्स्ट्रेलियाचा महान गोलंदाज शेर्न वॉर्न(Shane Warne) याचं शुक्रवारी ४ मार्च,२०२२ रोजी थोयलंड येथील को-सामुई येथील त्याच्या व्हिलात हृद्यविकाराच्या झटक्यानं निधन झालं. वयाच्या ५२ व्या वर्षी शेर्न वॉर्नचं असं जाणं संपू्र्ण जगातील क्रिकेट(Cricket) चाहत्यांसाठी चटका लावून गेलं. शेर्न वॉर्न हा भारतातही तितकाच लोकप्रिय होता. त्याचं दिसणं,राहणं,मैदानावरचं वागणं त्याच्या उमेदीच्या काळात अनेकांना भारावून टाकायचं. त्यात सचिन तेंडुलकर सोबतची त्याची खास मैत्री हे देखील एक म्हत्त्वाचं कारण होतं भारतीयांच्या मनात त्यानं घर करण्याचं. सर्वसामान्य भारतीय चाहताच नाही तर बॉलीवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी शेर्न वॉर्नच्या जाण्यावर दुःख व्यक्त केलं आहे. सोशल मीडियावरही जगभरातून चाहतागण त्याच्या जाण्यामुळे हळहळ व्यक्त करताना दिसतोय.

या सर्वांच्या लाडक्या शेर्न वॉर्नवर बॉलीवूडकर लवकरच बायोपीक काढणार असल्याची बातमी आता कानावर पडतेय. खरंतर ही आताची गोष्ट नाही,२०१५ मध्येच या विषयाला सुरुवात झाली होती. तेव्हा भारतातील एका निर्मिती संस्थेनं शेर्न वॉर्नला त्याच्यावर बायोपीक काढण्याची इच्छा व्यक्त केली. शेर्न वॉर्नला या भारतीय सिनेमासाठी काहीच हरकत नव्हती. फक्त त्यानं एक अट घातली होती त्यावर सगळं अडून राहिलं होतं. त्याला सिनेमात आपली व्यक्तिरेखा साकारण्यासाठी हॉलीवूड अभिनेता ब्रॅड पीट किंवा लिओनार्डो डिकार्पिओ सारखे कलाकार हवे होते. हा एक हॉलीवूड सिनेमा होता जो खास भारतीय प्रेक्षकांसाठी बनवला जाणार होता.

२०१५ मध्ये शेर्न वॉर्नवर येणाऱ्या या बायोपीकची अफवा वाऱ्यासारखी पसरली होती. शेर्न वॉर्ननं तेव्हा क्रिकेटमधनं निवृत्ती स्विकारली होती,त्यानंतर या बातमीनं जोर धरला होता. आधी कोणाचा विश्वास नव्हता,पण नंतर शेर्न वॉर्ननं बातमीवर सिनेमा येतोय असं कन्फर्मेशन दिलं होतं. लवकरच यावर काम सुरु देखील होणार होतं, पण आधी काही तांत्रिक अडचणी आणि नंतर दोन वर्ष कोरोनाचं साम्राज्य यात सिनेमा मागे पडला. पण गेल्या वर्षी पुन्हा शेर्न वॉर्ननं एका कार्यक्रमा दरम्यानं या बातमीला दुजोरा देत लवकच सिनेमावर काम सुरु होईल असं सांगितलं होतं. या सिनेमात शेर्न वॉर्नचा दर्जेदार खेळ या व्यतिरिक्त त्याच्या आयुष्यात सेक्स,ड्रग्ज यामुळे उठलेल्या वादळांवरही भाष्य केलं जाणार आहे. शेर्न वॉर्न आता आपल्यात नसला तरी या सिनेमाच्या निर्मिती नंतर त्याच्या मृत्य पश्चातही त्याचा जीवनप्रवास सिनेमाच्या रुपात कायम चाहत्यांच्या स्मरणात राहिल हे निश्चित.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

SCROLL FOR NEXT