shantit kranti 2 trailer lalit prabhakar alok rajwade priyadarshini indalkar mrunmayi godbole tvf  SAKAL
मनोरंजन

Shantit Kranti 2: तीन मित्र, बॅचलर ट्रिप जोडीला प्रियदर्शनी पण ठिकाण? शांतीत क्रांती 2 या तारखेपासून भेटीला

TVF भाडीपाच्या गाजलेल्या शांतीत क्रांतीचा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येतोय

Devendra Jadhav

शांतीत क्रांती ही वेबसिरीज प्रचंड गाजली. शांतीत क्रांती ही मराठीतली पहिली वेबसिरीज जी OTT प्लॅटफॉर्मवर आली होती. ललित प्रभाकर, मृण्मयी गोडबोले, आलोक राजवाजे, अभय महाजन अशा कलाकारांनी शांतीत क्रांतीचा पहिला सीझन गाजवला.

आता शांतीत क्रांती आवडणाऱ्यांसाठी खुशखबर! शांतीत क्रांतीचा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच त्याचा ट्रेलर भेटीला आलाय.

(shantit kranti 2 trailer)

काय आहे शांतीत क्रांती 2 च्या ट्रेलरमध्ये

पहिल्‍या सीझनला भव्‍य यश मिळाल्‍यानंतर 'शांतीत क्रांती'चा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दुसऱ्या सीझनमध्ये हास्‍याचा दुहेरी डोस आणि तिघेही मित्र स्वतःचा शोध घेण्याचा रंजक प्रवास करत आहेत.

१८ महिन्‍यांनंतर एकत्र येत श्रेयस (अभय महाजन) सर्व मुलांना लग्न करत असल्‍याची आनंदाची बातमी देतो आणि तिन्‍ही मुले श्रेयसच्‍या लग्नानिमित्त इंटरनॅशनल बॅचलर ट्रिपवर जाण्‍याचे ठरवतात.

अशातच प्रसन्‍नने (‍ललित प्रभाकर) त्‍याच्‍या बाळाला सोबत आणले आहे आणि दिनारने (अलोक राजवडे) बॅचलरच ट्रिपऐवजी १० अनोळखी व्‍यक्‍तींसह नेपाळला ६ दिवसांच्‍या तीर्थयात्रेवर जाण्‍यासाठी बस बुक केली आहे, मग पुढे एकच गोंधळ उडतो. एकूणच शांतीत क्रांती 2 मध्ये विविध ठिकाणांची सफर घडणार असुन प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे.

शांतीत क्रांती 2 मध्ये प्रियदर्शनी इंदलकर

भाडिपा आणि टीव्‍हीएफची निर्मिती असलेल्या शांतीत क्रांती 2 चे निर्माते अरूणभ कुमार आहेत. सारंग साठ्ये आणि पौला मॅकग्‍लीन यांनी दिग्दर्शन केले आहे.

या सिरीजमध्‍ये अभय महाजन, आलोक राजवडे, ललित प्रभाकर, मृण्‍मयी गोडबोले, प्रिया बॅनर्जी, प्रियदर्शिनी इंदलकर हे स्‍टार कलाकार आहेत.

शांतीत क्रांती 2 बद्दल ललित प्रभाकर म्हणतो...

ललित प्रभाकर म्‍हणाला, ''शांतीत क्रांती सीझन १ ला प्रेक्षकांकडून भरघोस प्रेम मिळाले. आम्‍हाला नवीन सीझनसह पुनरागमन करण्‍याचा आनंद होत आहे, जेथे आम्‍ही उलगडे, हास्‍य, ट्विस्‍ट्स, रोमांचने भरलेल्‍या नवीन प्रवासाची सुरूवात करत आहोत.

हा सीझन नात्‍यांना पुनर्परिभाषित करतो, तसेच नवीन पात्रांना सादर करतो, जे आमच्‍यापैकी प्रत्‍येकाला पुढे जाण्‍यास मदत करतात. आम्‍ही आशा करतो की, हा सीझन प्रेक्षकांचे मनोरंजन करेल आणि त्‍यांच्‍याशी संलग्‍न होईल.''

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ED Action against Anil Ambani : अनिल अंबानींवर ‘ED’ची मोठी कारवाई!, मुंबईतील अलीशान घर तात्पुरते जप्त

PCMC News : ‘स्थायी’च्या अध्यक्षपदासाठी अभिषेक बारणेंना संधी; एकमेव अर्ज दाखल; बिनविरोध निवड निश्चित, शनिवारी होणार शिक्कामोर्तब

Lung cancer in Mumbai : मुंबईत फुफ्फुसांच्या कर्करोगाच्या ५७ टक्के रुग्णांमध्ये प्रदूषण हेच प्रमुख कारण!

SL vs NZ, T20 WC: न्यूझीलंडची उपांत्य फेरीच्या दिशेने वाटचाल! श्रीलंकेचे आव्हान संपुष्टात, जाता जाता पाकिस्तानची लावली वाट

Bride shot at wedding ceremony Video : विवाहमंडपात थरार! नववधूवर माथेफिरू प्रियकरानं सर्वांसमोरच झाडली गोळी

SCROLL FOR NEXT