Sharad Kelkar dubbed for Prabhas in Hindi Baahubali
Sharad Kelkar dubbed for Prabhas in Hindi Baahubali 
मनोरंजन

शिवरायांची भूमिका केलेल्या शरद केळकरचा बाहूबलीमध्येही महत्त्वाचा 'रोल'

वृत्तसंस्था

मुंबई : बॉलिवूडमध्ये ऐतिहासिक चित्रपटांचे वारे वाहू लागले आहेत. अनेक चित्रपट सध्या अनेक चित्रपट हे त्यावर तयार होत आहेत. गेल्या काही काळात ‘पद्मावत’, ‘बाजीराव मस्तानी’, ‘मणिकर्णिका’, ‘केसरी’ असे अनेक चित्रपट येऊन गेले. त्यानंतर आता ‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’ या चित्रपटाची चर्चा आहे. बॉक्सऑफिसवर सध्या तान्हाजीने धुरळा केला आहे. यामध्ये अजय देवगण तानाजी मालुसरेंची भूमिका साकारली आहे. तर अभिनेता शरद केळकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसला आहे. शिवरायांची भूमिका साकारलेल्या शरद केळकर या टेलॅंटेड मराठी अभिनेत्याने 'बाहुबली' या चित्रपटामध्येही महत्त्वाचा रोल साकारला आहे. 

दाक्षिणात्य सुपरहिरो म्हणजे प्रभासचा बाहुबली हा चित्रपट फक्त देशात नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही आपला करीश्मा दाखवूव गेला. बाहुबलीचे दोन भाग आले आणि दोन्ही चित्रपट सुपरहिट ठरले. तेलुगु, तमिळ शिवाय तो हिंदीमध्येही प्रदर्शित झाला. पण, हिंदीमधील बाहुबलीच्या दमदार भूमिकेचा आवाज कोणी दिला आहे हे तुम्हाला माहित आहे का ? शरद केळकर आणि बाहुबली चित्रपटाचं नात काय आहे याचा विचार तुम्ही करत असाल. 

तर, प्रभास म्हणजेच चित्रपटातील बाहुबलीच्या सुपरहिरोला मराठोमळ्या शरदचा आवाज आहे. त्या चित्रपटामध्ये शरदचा आवाज डब करण्यात आला आहे. अमरेंद्र बाहुबली, महेंद्र बाहुबली आणि शिवा यांना त्याचाच आवाज आहे. एका मुलाखतीमध्ये शरदने सांगितले होते की,'' मी दिल्लीचा नाही पण, लोकांना मी 'दिल्ली का लडका' आहे असे वाटते.''

शरद केळकर याचा आवाज भारदस्त आहे. बॉलिवूडमध्येच नाही तर त्याने हॉलिवूडमध्येही डबिंग केले आहे. 2004 मध्ये दूरदर्शनच्या 'आक्रोश' मधून त्याने पदार्पण केले. सफर, रॉक एंड रोल फैमिली, उतरन, बैरी पिया, कुछ तो लोग कहेंगे, एजेंट राघव-क्राइम ब्रांच, शेर-ए-पंजाब: महाराजा रणजीत सिंह, कोई लौट के आया है या मालिकांमधून दिसला. नुकताच तो तान्हाजीमध्ये दिसला. तर, अॅमेझॉन प्राईमच्या 'द फॅमिली मॅन' या प्रसिद्ध वेब सिरिजमध्येही दिसला. 

या शिवाय हाऊसफुल 4, लय भारी, भूमी, रासलीला, मोहेंजोदारो, हिरो, गेस्ट इन लंडन अशा अनेक चित्रपटातून त्याने काम केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kanhaiya Kumar: कन्हैया कुमार यांच्याकडे एवढी आहे संपत्ती; दिल्लीच्या उमेदवारांमध्ये मनोज तिवारी सर्वात श्रीमंत

PM Modi's Advice To Muslims: जगभरातला मुसलमान बदलतोय पण... मुस्लिम धर्मियांना पहिल्यांदाच PM मोदींनी का दिला सल्ला?

Shekhar Suman : शेखर यांच्या मुलाला होता 'हा' गंभीर आजार; लेकाच्या निधनानंतर उचललं गंभीर पाऊल

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सांगोल्यात दोन गटांमध्ये हाणामारी, शेकाप कार्यकर्ते अन् शिवसैनिक भिडले

बापरे! बॉल समजून पकडला बॉम्ब ... 13 वर्षीय मुलाचा स्फोटात मृत्यू , नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT