sharad 
मनोरंजन

अभिनेता शरद मल्होत्रा कोरोना पॉझिटीव्ह, 'नागिन ५'च्या शूटींगला लागला ब्रेक

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ

मुंबई- कोरोना व्हायरसच्या संकटातंही सिनेमा आणि टीव्ही मालिकांचं शूटींग सुरु आहे. आत्तापर्यंत अनेक सेलिब्रिटी कोरोनाच्या विळख्यात आले आहेत आणि बरे होऊन पुन्हा एकदा कामावर देखील रुजु झाले आहेत. याच साखळीत आता आणखी एक नाव जोडलं जातंय ते म्हणजे टीव्ही अभिनेता शरद मल्होत्राचं. 'नागिन ५' मालिकेचं शूटींग करत असलेल्या अभिनेता शरद मल्होत्रा कोविड-१९ पॉझिटीव्ह आढळून आल्यानंतर मालिकेच्या शूटींगला ब्रेक लागला आहे.

दिग्दर्शक राजन शाही यांनी शरद मल्होत्राला कोरोनाचा संसर्ग झाल्याच्या बातमीला दुजोरा दिला. त्यांनी सांगितलं की 'शुक्रवारी दुपारी शरद मल्होत्राला कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळाली. जशी ही बातमी आमच्या पर्यंत पोहोचली आम्ही लगेचच ही शूटींग थांबवली. टीमच्या सगळ्या सदस्यांची कोरोना टेस्ट केली गेली. याचे रिपोर्ट दुस-या दिवशी येतील.

सध्या 'नागिन ५' या मालिकेचं शूटींग तीन दिवसांसाठी थांबवण्यात आलं आहे. पुढचं शूट इतर सदस्यांचे कोरोना रिपोर्ट आल्यानंतर सुरु केलं जाईल. सध्या अभिनेता शरद होम क्वारंटाईन आहे.'

अभिनेता शरदची को स्टार सुरभी चंदना हिने देखील पोस्ट केली आहे. तिने इंस्टाग्रामवर शरदसोबतचा फोटो शेअर करत लिहिलंय, 'माझ्यासाठी एवढी काळजी व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद. जसा माझ्या टेस्टचा रिझल्ट येईल मी तुम्हाला अपडेट करेन.'शरद मल्होत्रा सध्या 'नागिन ५' या मालिकेत दिसून येत आहे. चाहत्यांना शरदचा अभिनय चांगलाच पसंत पडतोय. शरदला 'बनू मै तेरी दुल्हन' या मालिकेतून खूप प्रसिद्धी मिळाली होती.    

sharad malhotra corona positive naagin 5 shoot stops  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT