jay pawar google
मनोरंजन

बॉलिवूड अभिनेत्रीसोबत अजित पवारांच्या मुलाचा फोटो चर्चेत..

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांचा एका अभिनेत्री सोबतच फोटो व्हायरल झाला असून जय पवारांकडे नेटकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

नीलेश अडसूळ

ENTERTAINMENT NEWS : राजकीय नेत्यांचे बॉलिवूड विश्वाशी असलेले स्नेह आपल्याला माहीतच आहे. अनेक राजकीय नेत्यांच्या कौटुंबिक सोहळ्यात कलाकार येत असतात तर कलाकारांच्या पार्ट्यांमध्ये नेते भेट देत असतात. अशीच काहीशी नवी कहानी राजकीय विश्वातून समोर येत आहे. राजकारणातील एका बड्या सुपुत्राचा एका अभिनेत्री सोबतचा फोटो व्हायरल झाला आहे.

शरद पवार (sharad pawar) यांचे नातू आणि अजित पवार (ajit pawar) यांचे पुत्र बॉलिवूडमधील एका प्रसिद्ध अभिनेत्री सोबत दिसत आहे. अजित पवारांचे पुत्र म्हणजे जय पवार. सध्या ते बारामतीच्या राजकारणात सक्रिय दिसत आहेत. बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) आणि जय पवार (jay pawar) यांचा एकत्रित फोटो सध्या नेटकऱ्यांसाठी चर्चेचा विषय झाला आहे.

jay pawar and urvashi rautela

फोटो नेमका कधीचा आहे हे स्पष्ट झालेले नाही. मात्र या फोटोमध्ये जय पवार आणि उर्वशी रौतेला या दोघांसह आणखी एक व्यक्ती दिसत आहे. काही माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार cine riser official या इन्स्टा पेजवरुन हा फोटो पोस्ट करण्यात आला होता. त्यांनी असा दावा केला होता की हा फोटो दुबईच्या बुर्ज-अल-अरब याठिकाणचा आहे. त्यानंतर सोशल मीडिया वर हा फोटो अनेकांनी शेअर केला.

हा फोटो व्हायरल झाल्यानंतर जय पवार आणि उर्वशी रौतेला एकमेकांना डेट करत आहेत का ? अशी चर्चा पसरली आहे. याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

उर्वशी रौतेला ही मिस युनिव्हर्स पेजेंट २०२१ मध्ये परीक्षक म्हणून होती. हेट लव्ह स्टोरी ४, सनम रे, ग्रेट ग्रँड मस्ती, पागलपंती, साईझ झिरो, मिस मॅच इंडिया, अंबरसरिया, ब्लॅक रोज, भाग जॉनी अशा अनेक चित्रपटांमध्ये उर्वशीने काम केले आहे. लवकरच ती (jio studios) जिओ स्टुडिओच्या ‘इन्स्पेक्टर अविनाश’या वेब सीरिजमध्ये रणदीप हुडा याच्यासोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

९-१० तास काम, ओव्हटाइम नाही, दिवसाला ६५० रुपयेच मिळतात; PMPLच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन, VIDEO VIRAL

धर्मस्थळ प्रकरणात नवा ट्विस्ट! महिलेने केला धक्कादायक खुलासा; 'त्या' पुरलेल्या 100 हून अधिक मृतदेहांचे सत्य उलगडणार?

Anil Ambani: अनिल अंबानी यांच्या अडचणी वाढल्या! ED नंतर मुंबईत CBIचा छापा; काय आहे 2,000 कोटींच प्रकरण?

ती प्राजक्ता नाहीच! गोविंदा आणि सुनीताच्या चर्चित घटस्फोटामुळे मराठी अभिनेत्रींची का सुरू आहे बदनामी?

Latest Marathi News Updates : कोल्हापुरात रात्री झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलिसांची दोन्ही समाजांसोबत बैठक

SCROLL FOR NEXT