Sharad Ponkshe Daughter Siddhi Become Pilot esakal
मनोरंजन

Sharad Ponkshe : 'बापाला आणखी काय हवं?' पोंक्षेंची लेक सिद्धी पायलट झाली!

सिध्दी शरद पोंक्षे आज पायलट झाली. इयत्ता ४ पासून तिने पाहिलेलं स्वप्न पुर्ण झालं.

युगंधर ताजणे

Sharad Ponkshe Daughter Siddhi Become Pilot : मराठी,हिंदी टीव्ही आणि चित्रपट क्षेत्रातील प्रसिद्ध सेलिब्रेटी, कलाकार शरद पोंक्षे हे नेहमीच वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत असतात. पोंक्षे हे त्यांच्या परखड वक्तव्यांसाठी ओळखले जातात. आपल्याला जी भूमिका योग्य वाटते त्यावर ते ठामपणे व्यक्त होतात. त्यासाठी त्यांना कित्येकदा ट्रोलिंगचा सामनाही करावा लागला आहे.

आपल्यावर कोण काय बोलते यापेक्षा आपल्याला जे महत्वाचे वाटते ते बिनधास्तपणे सांगायला, बोलायला हवे अशी भूमिका पोंक्षे यांनी नेहमीच घेतली आहे. आता ट्विट्वर त्यांची एक खास पोस्ट चर्चेत आली आहे. आपली लाडकी लेक सिद्धीचं कौतूक करणाऱ्या त्या पोस्टनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधले गेले आहे. पोंक्षे यांची मुलगी सिद्धी पायलट झाली आहे. तिनं तिच्या स्वप्नाला गवसणी घातली आहे. यानिमित्तानं पोंक्षे यांची पोस्ट कौतूकाचा विषय ठरत आहे.

Also Read - Adhik Shravan Maas : अधिक श्रावण मास चित्तशुद्धीचा पर्वकाळ

पोंक्षे यांनी ट्विटरवरुन ती पोस्ट शेयर करताना म्हटले आहे की, सिध्दी शरद पोंक्षे आज पायलट झाली. इयत्ता ४ पासून तिने पाहीलेलं स्वप्न पुर्ण झालं. अत्यंत खडतर परीस्थितीतून,माझं आजारपण,कोरोना, लॉकडाऊन, आर्थिक स्थिती बिकट हे सगळे अडथळे तिनं पार केले आहेत. बॅकेचं कर्ज काढून,कोणतीही सवलत,आरक्षण नसताना केवळ मेहनत ,बुध्दीमत्ता ,परिश्रम व निष्ठा या जोरावर ती पायलट झाली.

पोंक्षे यांनी आपल्या पोस्टमध्ये पुढे म्हटले आहे की, बापाला आणखी काय हवं नाही का? आज अभिमान अभिमान फक्त अभिमान वाटतोय तूझा सिध्दी. मोठी हो पुढे देशाची सेवा कर. उत्तम सेवा दे. करशिलच खात्रीच आहे. लव यू बाळा. पोंक्षे यांच्या त्या पोस्टवर चाहत्यांनी, नेटकऱ्यांनी कौतूकाचा वर्षाव केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Shetty : रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार, आणखी चौघांना अटक; मोबाईलसह महत्त्वाचे पुरावे हाती

IND vs PAK सामन्यानंतर वातावरण तापलं; सूर्या अन् हार्दिक कुलदीप यादववर भडकले, नेमकं काय घडले; पाहा Viral Video

5G च्या नावाखाली तुमची फसवणूक तर होत नाहीये ना? घरबसल्या 'इथून' चेक करा तुमच्या एरियातलं नेटवर्क

Latest Marathi News Update : नाशिकच्या दरी मातोरी परिसरात बिबट्याचा मुक्त संचार

Central Railway: शिमग्याला गावी जाणाऱ्यांसाठी आनंदवार्ता! विशेष रेल्वे गाड्यांना मुदतवाढ, आरक्षण सुरू; पाहा वेळापत्रक

SCROLL FOR NEXT