Sharad Ponkshe Esakal
मनोरंजन

Sharad Ponkshe:गांधीजींनाही मिळत होती पेन्शन! शरद पोंक्षेंनी सादर केले पुरावे

Vaishali Patil

मराठी मनोरंजन विश्वातील अभिनेते शरद पोंक्षे हे त्यांच्या वक्तव्यामुळे सातत्याने चर्चेत आहेत. नेहमी त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत कमी अन् वादात जास्त असतात.

शरद पोंक्षे समाज माध्यमांवर सक्रिय असतात. इतकच नाही तर ते अनेक सामाजिक आणि राजकीय विषयावर खूल्यापणे भाष्यही करत असतात. ते सोशल मीडियावर चर्चेत असतातच त्याचे व्हिडिओ देखील व्हायरल होत असतात. या व्हिडिओमुळे ते वादात देखील अडकतात.

तसचं काहीसं यावेळी झालं आहे. त्यांनी पुन्हा नवीन पोस्ट केली की त्यामुळे त्यांना टिकेचा सामना करावा लागला. यात त्यांनी काही फोटो शेयर केले आहेत. त्यात काही कागदपत्र दिसत आहे ज्यावर महात्मा गांधी यांच्या नावाचा उल्लेख आहे.

ही पोस्ट शेयर करत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलयं की, 'गांधीजींना मिळणाऱ्या पेन्शनचे पुरावे'..

आता त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

आता या पोस्टला एका नेटकऱ्यांनी लिहिलं की, 'भूतकाळातल्या गोष्टींवर आक्षेप घेण्यापेक्षा सध्याच्या वर्तमान परिस्थितीवर लक्ष देण्याची जास्त गरज आहे सर्वांनाच , कारण त्यावेळच्या गोष्टीवर आवाज उठवून आजच्या परिस्थितीवर , प्रश्नांवर, समस्यांवर उपाय निघणार नाही.' तर काहींनी सावरकर यांच्या बद्दल कमेंट केल्या आहेत. यातच माहत्मा गांधी यांच्याबद्दल देखील बऱ्याच प्रतिक्रिया आहेत.

शरद पोंक्षे केवळ अभिनेते नाहीत , एक वक्ता म्हणूनही देखील प्रसिद्ध आहेत. सावरकरांच्या विचारांना पोंक्षे पुजतात असं म्हटलं तर नक्कीच चुकीचं ठरणार नाही. शरद पोंक्षे यांची भाषणं नेहमीच सावरकरांच्या विचारधारेनं प्रेरित असतात. त्यात आता त्यांच्या या पोस्टने सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहेत.

शरद पोंक्षे यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर सध्या ते झी मराठीवरील दार उघड बये या मालिकेत दिसत आहेत. काही दिवसांपुर्वी त्यांनी ठिपक्यांची रांगोळी या मालिकेला निरोप दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT