Sharad Ponkshe talks about what is hindu religion sakal
मनोरंजन

Sharad Ponkshe: हिंदू धर्म म्हणजे नेमकं काय?.. शरद पोंक्षे यांनी थेटच सांगितलं.. ऐकाच!

शरद पोंक्षे यांचा 'हा' व्हिडिओ होतोय व्हायरल..

नीलेश अडसूळ

Sharad Ponkshe : मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेते शरद पोंक्षे सध्या बरेच चर्चेत आहेत. त्यांची वादग्रस्त विधाने आणि राजकीय मतं यामुळे सर्वांचे लक्ष त्यांच्याकडे लागलेले असते. ते स्वतः समाज माध्यमांवर सक्रिय असतात.

इतकच नाही तर ते अनेक सामाजिक आणि राजकीय विषयावर निर्भीडपणे भाष्यही करत असतात. पोंक्षे यांचे विचार, हिंदुत्वाप्रती असलेलं प्रेम आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर असलेली निष्ठा सर्वांनाच माहीत आहे.

शरद पोंक्षे अभिनयासोबतच राष्ट्रप्रेमावर व्याख्यान देत असतात. हिंदुत्व आणि स्वातंत्र्यवीर सावरकर या विषयांवर त्यांचा प्रचंड अभ्यास आहे. सध्या त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्यांनी हिंदू धर्म म्हणजे काय ही सांगितलं आहे.

(Sharad Ponkshe talks about what is hindu religion)

शरद पोंक्षे यांनी नुकताच त्यांच्या एका व्याख्यानातील व्हिडिओ सोशल मीडियावर शेयर केला आहे. ज्यामध्ये हिंदूधर्म म्हणजे काय? मुसलमान धर्म म्हणजे काय आणि मनुष्य धर्म म्हणजे काय यावर ते बोलले आहेत. हा व्हिडिओ सध्या तूफान व्हायरल होत असून चर्चेचा विषय ठरला आहे.

यामध्ये शरद पोंक्षे म्हणतात, 'आता आपण पुढे जाऊन पाहूया.. हिंदू धर्म म्हणजे काय?.. मुसलमान धर्म म्हणजे काय?.. जसं प्रत्येक वस्तूला निसर्गाने दिलेला जन्मजात एक धर्म आहे.. गुणधर्म आहे.. ज्याला आपण धर्म म्हणतो.''

पुढे ते म्हणतात, ''तसंच मनुष्य हा देखील निसर्गानेच जन्माला घातलेला आहे.जसं वनस्पतीला धर्म आहे, झाडाला धर्म आहे, नदीला धर्म आहे, अग्नीला धर्म आहे.. तसंच माणूस या नावाच्या प्राण्यालाही एक धर्म आहे, तो म्हणजे दुसऱ्या माणसाशी माणूस म्हणून माणुसकीनं आणि प्रेमानं वागणं..'' शरद पोंक्षे यांचा हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation Protest : मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महापालिका मुख्यालय आणि सीएसटीएम समोरील वाहने हटवण्यास सुरुवात

Sinhagad Road Flyover : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपूलाचे उद्घाटन, नियोजित वेळेपेक्षा सहा महिने आधी पूर्ण

पोलिस आयुक्तांनी काढला ‘डीजे’वरील निर्बंधाचे आदेश! गणपती विसर्जन मिरवणूक व ईद ए-मिलादच्या मिरवणुकीत नाही 'डीजे'ला परवानगी; आदेश मोडल्यास होणार ‘ही’ शिक्षा

Nilesh Rane on Manoj Jarange : जरांगेंनी भावाला चिचुंद्री म्हटलं, आमदार निलेश राणे भडकले; म्हणाले, राणे कुटुंबावर...

Shahu Maharaj : मराठा आरक्षणाच्या आंदोलनात शाहू महाराजांची एन्ट्री; म्हणाले, 'सरकारने जबाबदारी टाळली तर गंभीर परिणाम भोगावे लागतील'

SCROLL FOR NEXT