Sharad Ponkshe tweet on hinduism and swanatryaveer savarkar thoughts  sakal
मनोरंजन

Sharad Ponkshe: मला हिंदूंचीच भिती वाटते, कारण.. शरद पोंक्षे यांचे वादग्रस्त विधान

अभिनेते शरद पोंक्षे यांनी हिंदुत्वावर खळबळजनक पोस्ट केली आहे.

नीलेश अडसूळ

sharad ponkshe: मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेते शरद पोंक्षे सध्या बरेच चर्चेत आहेत. त्यांची वादग्रस्त विधाने आणि राजकीय मतं यामुळे सर्वांचे लक्ष त्यांच्याकडे लागलेले असते. ते स्वतः समाज माध्यमांवर सक्रिय असतात. इतकच नाही तर ते अनेक सामाजिक आणि राजकीय विषयावर निर्भीडपणे भाष्यही करत असतात. पोंक्षे यांचे विचार, हिंदुत्वाप्रती असलेलं प्रेम आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर असलेली निष्ठा सर्वांनाच माहीत आहे. त्याच विषयावर आधारित एक खळबळजनक ट्विट त्यांनी केले आहे.

(Sharad Ponkshe tweet on hinduism and swanatryaveer savarkar thoughts )

शरद पोंक्षे अभिनयासोबतच राष्ट्रप्रेमावर व्याख्यान देत असतात. हिंदुत्व आणि स्वातंत्र्यवीर सावरकर या विषयांवर त्यांचा प्रचंड अभ्यास आहे. सध्या भाजपचे सरकार आल्यापासून राज्यात हिंदुत्वाचे वारे प्रचंड वेगाने वाहत आहेत. परिणामी काही वादही सुरू झाले आहेत. एकीकडे कट्टर हिंदुत्वाचा विरोध होत आहे तर कुठे महापुरुषांचा अपमान केला जात आहे. पण या परिस्थितीत सारे हिंदू एकत्र नाहीत, याची जाणीव शरद पोंक्षे यांना झाली आहे. म्हणूनच त्यांनी सावरकरांच्या एका विधानाची आठवण करून दिली आहे.

या पोस्ट मध्ये पोंक्षे म्हणतात, 'सातत्यानं सावरकर आठवतात.. १०० वर्षांपूर्वी ते म्हणाले की, “मला मुसलमानांची,ख्रिश्चनांची भिती वाटत नाही, मला हिंदूंचीच भिती वाटते, कारण हिंदूच हिंदूत्वाच्या विरोधात ऊभे राहतात”.. या पोस्ट सोबत त्यांनी एक वादग्रस्त विधानही केले आहे. '' ह्या पोस्टवर जी कूत्री भूंकतील त्यांना “हाड” असही म्हणणार नाही.'' असे पोंक्षे यांनी म्हंटले आहे.

या ट्विट मध्ये त्यांचा रोख नेमका कुणाकडे ही त्यांनी स्पष्ट लिहिलं नसलं तरी त्यांच्या या ट्विटची प्रचंड चर्चा आहे. आता यातून कोणता नवा वाद उभा राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bankipur Election Result 2026 : भाजपाला मोठा धक्का! ३० वर्षांचा गड ढासळला; बांकीपूर पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा दणदणीत विजय

'पूर्ण सिस्टमच त्याला वाचवतेय...'; बृजभूषण यांच्या निर्दोष सुटकेनंतर Vinesh Phogat काय म्हणाली? मोठं पाऊल उचलण्याचा इशारा

Latest Marathi News Live Update : बारवी धरण ९१ टक्के भरलं; दरवाजे कधीही उघडण्याची शक्यता, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Temple Development : डोंगरगाव शिवच्या तोंडेश्वर महादेव मंदिराला तीर्थक्षेत्र 'ब' वर्गाचा दर्जा; आमदार अनुराधा चव्हाण यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

Liquor Ban: मद्यप्रेमींसाठी मोठी बातमी! ओल्ड मॉन्क, आरसीसह 'या' दारू ब्रँड्सच्या विक्रीवर बंदी; FSSAI ने का उचललं हे पाऊल?

SCROLL FOR NEXT