ashneer grover, shark tank india, shark tank, kolhapur SAKAL
मनोरंजन

तांबडा पांढरा रस्सा आणि.. Shark Tank फेम Ashneer Grover चा बायकोसोबत कोल्हापुरात मराठमोळा अंदाज

अशनीर बायकोसोबत कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात दर्शनासाठी गेलेला

Devendra Jadhav

Ashneer Grover News: Shark Tank हा शो प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे. शार्क टॅंक मधले सगळे Sharks प्रेक्षकांचे लाडके लाडके आहेत. शार्क टँकच्या दुसऱ्या सिझनला सुध्दा प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय.

परंतु दुसऱ्या सिझनमध्ये परखड, रोखठोक असलेल्या अशनीर ग्रोव्हरला मात्र सगळेजण मिस करत आहेत. अशनीर शार्क टँक मध्ये दिसत नसला तरीही तो सोशल मीडियावर चाहत्यांच्या संपर्कात आहे. अशनिरचा नुकताच एक मराठमोळा अंदाज दिसून आला.

(shark tank fame ashneer grover visit kolhapur mahalakshmi temple with his wife)

अशनीर बायकोसोबत कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात दर्शनासाठी गेलेला. अशनीरने त्याची बायको माधुरी सोबत कोल्हापूर महालक्ष्मी मंदिराबाहेरचा फोटो सोशल मीडियावर शेयर केलाय.

महाराष्ट्रातील कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात.. प्राचीन, अध्यात्मिक आणि शांत करणारं ठिकाण अशा अंदाजात अशनीरने कॅप्शन लिहून बायकोसोबतचा हा खास फोटो शेयर केलाय.

अशनीर कोल्हापूरला आलाय हे कळताच त्याच्या फॅन्सनी कमेंट करून त्याचं कोल्हापूर नगरीत स्वागत केलंय. "वेलकम टू कोल्हापूर अशनीर सर..",

"कोल्हापूर शहरात स्वागत अशनीर सर..", "कोल्हापुरी जेवणाचा जरूर आस्वाद घ्या.. तांबडा पांढरा रस्सा जरूर ट्राय करा", असा शब्दात नेटकऱ्यांनी कमेंट करत अशनीरचं स्वागत केलंय.

अशनीर भारत पेचा संस्थापक आहे. परंतु भारत पे मधून अशनीरला पायउतार व्हावे लागले. दरम्यान शार्क टॅंक इंडियाचा पहिला सीझन अशनीरने गाजवला.

अशनीरचं रोखठोक बोलणं, त्याचा स्पष्टवक्तेपणावर लोकांनी टीका केली. परंतु याच अशनीरला आता शार्क टॅंक इंडियाच्या दुसऱ्या सिझनमध्ये मात्र प्रेक्षक अशनीरला मिस करत आहेत.

काही दिवसांपुर्वी अशनीरने सलमान खानच्या बिग बॉस शो बद्दल एक वक्तव्य केलेलं ते प्रचंड गाजलं होतं. अशनीर ग्रोवर म्हणाले,''तुम्ही मला त्या शो मध्ये कधीच पाहणार नाही. त्या शो मध्ये केवळ अपयशी लोक जातात, यशस्वी माणसं जात नाहीत...

एक काळ होता जेव्हा हा शो मी पहायचो पण आता त्याचा दर्जा घसरला आहे. या शो च्या टीमनं मला संपर्क केला होता, मी लगेच सॉरी म्हणत माझा नकार कळवला''.

अशापद्धतीने अशनीरने बिग बॉस शो बद्दल वक्तव्य केलं होतं. अशनीर शार्क टॅंक इंडिया सोडल्यावर 'दोगलापन' हे स्वतःचं पुस्तक प्रकाशित केलं

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

Vijay Pawar: बीड लैंगिक छळ प्रकरणातल्या विजय पवारचे कारनामे! RTE कायद्याला जुमानत नव्हता, सरकारी कार्यालयात घातला होता गोंधळ

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

SCROLL FOR NEXT