Shark Tank India 2 esakal
मनोरंजन

Shark Tank India 2 : वय वर्षे १८ फक्त! महिन्याला कमावतो...जजेस झाले थक्क, 'तू तर...'

तुझं वय किती तू बोलतो किती, हे सगळं कुठून शिकून आलास, असे प्रश्न त्याला विचारावे लागले. आता १८ वर्षाचा असणाऱ्या त्या उद्योजकानं दहावी सोडून व्यवसायाची वाट धरली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Shark Tank 2 News : टीव्ही मनोरंजन विश्वामध्ये ज्या रियॅलिटी शो नं प्रेक्षकांना वेडं केलं त्या शार्क टँकची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. सध्या या शो चा दुसरा सीझन सुरु आहे. त्यामध्ये सहभागी झालेल्या काही नवउद्योजकांनी परिक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यातील एका छोट्याशा उद्योगपतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्याची चर्चा आहे.

शार्क टँकमध्ये आलेल्या त्या छोट्याशा उद्योजकानं परीक्षकांना जिंकून घेतले आहे. शेवटी त्यांना त्याला बोलताना मध्येच थांबवावं लागलं. तुझं वय किती तू बोलतो किती, हे सगळं कुठून शिकून आलास, असे प्रश्न त्याला विचारावे लागले. आता १८ वर्षाचा असणाऱ्या त्या उद्योजकानं दहावी सोडून व्यवसायाची वाट धरली आहे. विशेष म्हणजे त्यानं वयाच्या अवघ्या आठव्या वर्षीच व्यवसायाला सुरुवात केली होती.

Also Read - रायगडमध्ये पर्यटनासाठी येतेय नवी संधी

तो जेव्हा बोलायला लागला तेव्हा त्या शोमध्ये असणाऱ्या नमिता थापर, अनुपम मित्तल, अमित जैन, पियुष बन्सल आणि विनिता सिंग हे तर थक्क झाले. त्यांना त्याची गोष्ट ऐकून काय बोलावे हेच कळेना. शार्क टँक इंडियाच्या त्या शोची सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा आहे. त्यानं चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

आपण पाहतो की, शार्क टँकमध्ये वेगवेगळ्या आयडिया घेऊन जजेसला प्रभावित करणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. त्यांच्याकडून कोट्यवधीचे चेक घेऊन जाणाऱे खूप आहेत. मात्र त्यापैकी फार कमी उद्योजक असे आहेत ज्यांना त्या परिक्षकांचे प्रेम मिळते. पण सध्या त्या १८ वर्षाच्या उद्योजकाची मोठ्या प्रमाणावर चर्चा होताना दिसते आहे. त्यानं वयाच्या अवघ्या आठव्या वर्षापासून व्यवसायाला सुरुवात केली होती.

कलेच्या जोरावर त्यानं पैसा कमवायला सुरुवात केली होती. त्याची चित्रकला चांगली असल्यानं त्यानं त्या जोरावर आपले पेटिंग विकण्यास सुरुवात केली. त्यातून त्यानं बक्कळ पैसा कमावला. त्याची ही गोष्ट जेव्हा तो जजेसला सांगत होता तेव्हा ते ऐकतच बसले. त्याच्या चित्रकलेनं त्यांना प्रभावित केले. तुझं वय किती तू बोलतो किती असे प्रश्न त्यांनी त्याला केले. काही दिवसांपूर्वी त्यानं त्याचा १८ वा वाढदिवस साजरा केला. महिन्याला दहा हजार रुपये कमावणाऱ्या या मुलाच्या मनोगतानं तर परिक्षक चकीत झाले होते.

शार्क टँकचे जजेस त्याच्यावर भलतेच खुश झाले आहेत. ते आता त्याला किती रुपयांची ऑफर देतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. बाकी काही का असेना मात्र त्या चिमुकल्यानं प्रेक्षकांना आणि जजेसला जिंकून घेतले आहे. सध्या त्याच्या नावाची सोशल मीडियावर चर्चा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT