Shark Tank India 2  esakal
मनोरंजन

Shark Tank India 2 : अगोदर पैसे वाटत सुटले, आता लावला डोक्याला हात! शार्क टँकच्या जजेसला झटका, तब्बल...

टीव्ही मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध रियॅलिटी शो शार्क टँक इंडियाच्या दुसऱ्या सीझनला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसतो आहे.

सकाळ डिजिटल टीम

Shark Tank India 2 : टीव्ही मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध रियॅलिटी शो शार्क टँक इंडियाच्या दुसऱ्या सीझनला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. त्यामध्ये सहभागी झालेल्या जजेसच्या प्रतिक्रिया या नेहमीच चर्चेत असतात. आता एका पोस्टनं मात्र वेगळीच बाब समोर आली आहे.

अंकित च्या एका पोस्टनं शार्क इंडियामधील जजेसला झालेला तोटा हा आता समोर आला आहे. आपल्याला भलेही हा शो कितीही मोठा वाटत असला किंवा त्यातील जजेस कितीही मोठी रक्कम नवउद्योजकांना देत असले तरी त्यांना झालेला तोटा किती हे आता व्हायरल झाले आहे.

Also Read - दुधदुभते मुबलक हवे....मग हे नक्कीच वाचा

अंकितने शार्क टँक अमेरिका आणि शार्क टँक इंडिया यांच्यात तुलना केली आहे. यावेळी त्यानं शार्क टँकमधील जजेसला किती मोठा तोटा झाला आहे. त्यांनी जो पैसा नवउद्योजकांना दिला त्यामुळे त्यांच्या बिझनेसला आलेला तोटा हा महत्वाचा विषय आहे. यावेळी त्यानं विनिता सिंग, गजल अलघ, अशनीर ग्रोव्हर, अनुमप मित्तल यांचे बिझनेस आणि त्यांची कमाई यावर पोस्ट केली आहे.

Shark Tank India 2

अंकित उत्तमच्या व्हायरल झालेल्या त्या पोस्टवर अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यानं म्हटलं आहे की, विनिता सिंहच्या शुगर कॉस्मेटिकला २०२२ च्या वर्षात ७५ कोटींचा तोटा झाला आहे. तर गजल अलघला १४ कोटींच्या नुकसानीला सामोरं जावं लागलं आहे. अशनीर ग्रोव्हरच्या २०२२ मध्ये भारतपेला तर पाच हजार कोटींचा तोटा झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळेच की काय कंपनीनं अशनीरला हटवले होते.

पियुष बन्सलला झाला १०२ कोटींचा तोटा..

शादी डॉटकॉम, मकान डॉट कॉम या अनुपम मित्तलच्या साईटला झटका बसल्याचे सांगण्यात आले आहे. पियुष बन्सलच्या लेन्स कार्टला २०२२ मध्ये १०२ कोटींचा तोटा झाला आहे. अमित जैन या सीझनमध्ये पहिल्यांदाच आला आहे. त्याच्या कार देखो या कंपनीला २४६ कोटींचा तोटा झाला आहे. यासगळ्यात अंकित उत्तम यांचे म्हणणे आहे की, नमिता थापरला त्या तुलनेत फारसा काही फरक पडलेला नाही. कारण ती कंपनी तिच्या वडिलांची आहे.

यागळ्यात अमन गुप्ताच्या बोट कंपनीला फायदा झाला आहे. त्यानं नमितावर नेपोटिझमचा आरोप केला होता. त्यामुळे सोशल मीडियावर वेगवेगळ्या चर्चेला उधाणही आले होते. नमिता थापर ही एमक्योर या कंपनीची सीइओ आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आशियाई विजेत्या भारतीय तिरंदाजांची अवहेलना; १० तास विमानतळावर अडकले; अस्वच्छ धर्मशाळेत वास्तव्य...

Grain Scam:'शासकीय धान्याचा ८७ लाखांचा अपहार'; फलटण तालुक्यातील धक्कादायक प्रकार, सातारा जिल्ह्यात उडाली खळबळ..

मोठी बातमी! शैक्षणिक सहलींसाठी विद्यार्थ्यांसाठी सहलीत ५० टक्के सवलत; प्रत्येकास १० लाखांचा अपघात विमाही; एसटी महामंडळाचे आगारप्रमुख जाणार शाळांमध्ये

आजचे राशिभविष्य - 19 नोव्हेंबर 2025

Horoscope Prediction : आज तयार होतोय अमला राजयोग; मेष आणि या पाच राशींच्या आर्थिक अडचणींना लागणार पूर्णविराम !

SCROLL FOR NEXT