Sharmila Tagore compare her old superhit movie with RRR. Esakal
मनोरंजन

Sharmila Tagore यांनी आपल्या जुन्या वादग्रस्त ठरलेल्या सिनेमाशी केली RRR ची तुलना..म्हणाल्या..

शर्मिला टागोर यांनी केलेले काही सिनेमे वादग्रस्त ठरले होते पण त्याच सिनेमांनी बॉक्सऑफिसवर गडगंज कमाई केली होती.

प्रणाली मोरे

Sharmila Tagore सध्या त्यांच्या 'गुलमोहर' या वेबसीरिजमुळे चर्चेत आल्या आहेत. अभिनयक्षेत्रातलं त्यांचं हे कमबॅक म्हणावं लागेल. ६० आणि ७० चं दशक शर्मिला टागोर यांनी गाजवलं आहे. त्यावेळच्या हायेस्ट पेड अभिनेत्रींमध्ये त्यांचे नाव सामिल होते.

शर्मिला टागोर यांनी आपल्या करिअरमध्ये काही असे अनेक सिनेमे केले ज्यांनी काही ना काही कारणानं वाद छेडला. पण यातील त्यांच्या परफॉर्मन्सची मात्र प्रशंसा केली गेली. यातील एक सिनेमा आहे 'आराधना'. जो १९६९ साली रिलीज झाला होता. शर्मिला टागोर यांनी आपल्या या सिनेमाची तुलना RRR शी केली आहे.(Sharmila Tagore compare her old superhit movie with RRR)

शर्मिला टागोर काही दिवसांपूर्वी दिल्ली मधील एका चर्चासत्रात सामिल झाल्या होत्या. त्याचं नाव होतं Breaking The Boundaries:An Accidental Actor To An Idol.

या चर्चासत्रात संवाद साधताना शर्मिला यांनी सांगितलं की १९६७ मध्ये 'अॅन इव्हिनिंग इन पॅरिस' सिनेमा केल्यानंतर त्यांनी खूप अर्थपूर्ण सिनेमे करण्याकडे आपला कल वळवला.

बोलता बोलता शर्मिला यांनी तो काळ आठवला जेव्हा आराधना रिलीज झाल्यानंतर चेन्नई मध्ये हिंदीच्या विरोधात आंदोलन सुरु झालं होतं.

हेही वाचा: Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्या वादाची आठवण काढत शर्मिला टागोर म्हणाल्या,''जेव्हा आराधना १९६९ साली रिलीज झाला होतो तेव्हा हिंदी विरोधात खूप मोठं प्रदर्शन चेन्नईत सुरु झालं होतं. त्यावेळी हिंदी भाषेला बॉयकॉट केलं जात होतं जणू. पण तरिदेखील 'आराधना' सिनेमागृहात ५० आठवडे चालला होता. तो आमच्या वेळचा RRR सिनेमा होता['.

''त्यावेळी हे सिद्ध झालं की भाषेपेक्षा मोठ्या भावना आहेत. आपले सिनेमे मग ते कुठल्याही राज्यातून आलेले असोत..लोकांना हसवतात आणि रडवतात. त्यामुळे आपल्यात मतभेदांवर भारी पडतात त्या या समान मतांच्या विचारधारणा''.

माहितीसाठी इथं सांगतो की राजामौली यांचा 'आरआरआर' सिनेमा तेलुगू भाषेत बनवला गेला होता पण त्याला हिंदी भाषेतही रिलीज केलं गेलं होतं. सिनेमाला साऊथमध्येच नाही तर बॉलीवूडच्या प्रेक्षकांनी देखील डोक्यावर उचलून धरलं होतं.

परदेशातही या सिनेमाला प्रेम मिळालं. जवळपास ५५० करोड बजेटमध्ये बनलेल्या या सिनेमानं बॉक्सऑफिसवर १२०० करोडहून अधिक कमाई केली. या सिनेमातील 'नाटू नाटू' गाण्याला गोल्डन ग्लोब आणि बेस्ट ओरिजनल सॉंगचा ऑस्कर पुरस्कार देखील मिळाला.

'एॅन इव्हिनिंग इन पॅरिस' सिनेमात शर्मिला टागोर यांनी बिकिनी घातली होती त्यावरनं देखील वाद रंगला होता. संसदेत ते प्रकरण पोहोचलं होतं. पण या सिनेमानंतर शर्मिला टागोर यांनी ग्लॅमरस भूमिका करण्या व्यतिरिक्त अर्थपूर्ण व्यक्तिरेखा साकारण्याचा निर्णय घेतला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrashekhar Bawankule : मुख्यमंत्री फडणवीस केंद्रीय मंत्री तर बावनकुळे मुख्यमंत्री? स्वत: मंत्री बावनकुळेंनींच दिलं स्पष्टीकरण

NGO साठी सुवर्णसंधी! HCL Foundation देणार 24 कोटी रुपयांचे अनुदान; अर्ज प्रक्रिया सुरू, पाहा सविस्तर

Horoscope : उद्या बनतोय दुर्मिळ दशकीर्ती योग! 'या' 5 राशी होणार मालमाल; करिअर-व्यवसायात भरभराट, आरोग्याची मोठी समस्या होणार दूर

शाहरुखने खरेदी केलं दिल्लीतील 'ते' घर, जिथं किंग खानने गौरीसोबत अनुभवला स्ट्रगल काळ, कोट्यवधींमध्ये झाली डील

Latest Marathi News Update : फिरोज शेख यांचे मेहुणे अन्वर खाजा बाऊददीन यांनी आरोप फेटाळले

SCROLL FOR NEXT