Sharmila Tagore : 'बॉलीवूडमध्ये फक्त अमिताभ यांच्यासाठीच...' शर्मिला टागोरांची मोठी खंत!

एक दोन नव्हे तर तब्बल तेरा वर्षानंतर गुलमोहर चित्रपटाच्या माध्यमातून पुन्हा प्रेक्षकांसमोर येत आहेत.
Sharmila Tagore
Sharmila Tagore esakal

Sharmila Tagore Bollywood Actress Amitabh Bachchan : बॉलीवूडची एव्हरग्रीन अभिनेत्री शर्मिला टागोर या त्यांच्या परखड वक्तव्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री आहेत. आता त्यांनी बॉलीवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन आणि अनुपम खेर यांच्यावर टीप्पणी केली आहे. जी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आली आहे. शर्मिला टागोर यांची मुलाखत नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

एक दोन नव्हे तर तब्बल तेरा वर्षानंतर गुलमोहर चित्रपटाच्या माध्यमातून पुन्हा प्रेक्षकांसमोर येत आहेत. चार दशकांहून अधिक काळ शर्मिला टागोर यांनी आपल्या अभिनयानं चाहत्यांच्या मनात आदराचे स्थान मिळवले आहे. त्यानंतर त्यांनी एका मुलाखतीमध्ये सध्याच्या घडीला जे राजकारण होते आहे त्याकडे चाहत्यांचे, नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. अमिताभ बच्चन आणि अनुपम खेर यांच्यावर प्रतिक्रिया देताना शर्मिला टागोर यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Also Read - स्टाॅक मार्केटमधलं ट्रेडर बनायचंय..मग ही पथ्यं पाळाच...

बॉलीवूडमध्ये जे काही पावरफुल रोल आहेत ते नेहमीच पुरुष अभिनेत्यांना मिळतात. महिला कलाकारांना नेहमीच डावलले जाते. अशी प्रतिक्रिया टागोर यांनी देताना अमिताभ बच्चन, अनुपम खेर यांच्या नावाचा उल्लेख केला आहे. पीटीआय़ला दिलेल्या त्या मुलाखतीनं बॉलीवूडमध्ये पुन्हा एका नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. हिंदी, बंगाली चित्रपटांमध्ये आपल्या नावाची वेगळी ओळख निर्माण केलेल्या शर्मिला यांचा चाहतावर्ग मोठा आहे.

शर्मिला या २०१० मध्ये एका चित्रपटामध्ये दिसल्या होत्या. त्यानंतर आता त्या तेरा वर्षांनी गुलमोहरमधून समोर येणार आहेत. त्याच्या निमित्तानं त्यांनी काही गोष्टींवर परखडपणे विचार मांडले आहेत. दुर्देवानं बॉलीवूडमध्ये अभिनेत्रींसाठी भूमिका लिहिल्या जात नाही. बॉलीवूडमध्ये फक्त अमिताभ बच्चन आणि अनुपम खेर यांच्यासाठीच स्पेशल स्क्रिप्ट लिहिल्या जातात. अशी खंत टागोर यांनी व्यक्त केली आहे.

Sharmila Tagore
Bigg Boss: 'या केवळ अफवा', प्रियांकाने सोडलं मौन

दमदार कथा असेल तर त्यात पहिल्यांदा विचार पुरुष अभिनेत्याचा केला जातो. महिलांना तिथे डावलले जाते. यावेळी त्यांनी अभिनेत्री नीना गुप्ता यांचे कौतूक केले. वयाच्या ६३ व्या वर्षी ज्या उत्साहानं त्या काम करत आहेत ते कौतूकास्पद असल्याचे शर्मिला यांनी म्हटले आहे. हॉलीवूडमध्ये ज्या प्रमाणे अभिनेत्रींना केंद्रस्थान असते तसे आपल्याकडे का नाही असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

Sharmila Tagore
Bigg Boss 16: फराह खानच्या घरी दणक्यात रंगली बिग बॉस पार्टी.. पार्टीत चर्चा फक्त शिव आणि निम्रीतची

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com