Sharmila Tagore
Sharmila Tagore Esakal
मनोरंजन

Sharmila Tagore यांच्या बिकिनीतील फोटोंनी संसदेत केला होता धमाका..अभिनेत्रीवर अर्ध्या रात्री ओढवलेली 'ही' परिस्थिती..

प्रणाली मोरे

Sharmila Tagore: आजच्या काळात रोज एखादी तरी बॉलीवूडची अभिनेत्री सोशल मीडियावर बिकिनीतील फोटो शेअर करताना दिसते. पण सत्तरच्या दशकात काळ वेगळा होता. एखाद्या अभिनेत्रीनं बिकिनी घालणं ही काही साधीसुधी गोष्ट नव्हती.

अशा वेळी शर्मिला टागोरनं १९६७ मध्ये आलेला 'अॅन ईव्हिनिंग इन पॅरिस' मध्ये बिकिनी घालून खळबळ उडवली होती. काही दिवसांपूर्वीच शर्मिला टागोर यांनी बिकिनी घातल्यामुळे त्यांना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागला होता याचे शॉकिंग खुलासे केले आहेत.(Sharmila Tagore spoke about reaction on her bikini scene in an evening in paris)

शर्मिला टागोर काही दिवसांपूर्वी टीओआईच्या एका कार्यक्रमात पोहोचल्या होत्या आणि त्यांनी बिकिनीवाला त्यांचा तो किस्सा शेअर केला. आपण बिकिनी घातल्यामुळे बॉलीवूडला देखील धक्का बसला होता. एवढंच नाही तर ते प्रकरण संसदेत पोहोचलं होतं, असंही त्या म्हणाल्या.

हेही वाचा: Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

कार्यक्रमा दरम्यान शर्मिला म्हणाल्या,''जेव्हा मी 'अॅन ईव्हिनिंग इन पॅरिस' मध्ये काम केलं होतं त्यावेळी त्यातील माझा बिकिनीवाला सीन हैराण करणारा होता. सर्वसामान्य लोकच नाही तर इंडस्ट्रीतील लोकांसाठी मी बिकिनी घालणं शॉकिंग सरप्राईज होतं.संसदेत देखील यावरनं मुद्दा छेडला गेला होता. शर्मिला टागोर पुढे म्हणाल्या की,''आजच्या काळात आपण ज्या पद्धतीचे सिनेमे पाहतो त्याच्यासमोर ते काहीच नव्हतं''.

शर्मिला टागोर यांनी सांगितलं की, त्यांनी त्यावेळी घराच्या जवळ रस्त्यावर लागलेले बिकिनीतील पोस्टर एका रात्रीत हटवले होते.अर्ध्या रात्री त्या आपल्या ड्रायव्हरला घेऊन बाहेर पडल्या होत्या आणि जवळपास लागलेले बिकिनीतील पोस्टर हटवले होते.

यामागचं कारण एकच होतं की दुसऱ्या दिवशी शर्मिला टागोर यांच्या सासूबाई मुंबईत येणार होत्या. शर्मिला म्हणाल्या की त्यांना ही गोष्ट माहित नव्हती की त्यांचे बिकिनीतले पोस्टर एअरपोर्टच्या रस्त्यावरही लागले असतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salary Hike: आनंदाची बातमी! यावर्षी कर्मचाऱ्यांची होणार 12 टक्क्यांपर्यंत पगारवाढ; अहवालात माहिती उघड

Revoting: दोन गटांतील हाणामारीत 'ईव्हीएम'ची तोडफोड, 'या' राज्यात फेरमतदानाला सुरूवात

Latest Marathi News Live Update: ठाकरे गटाचे उमेदवार आज दाखल करणार अर्ज

Sangli Lok Sabha: "विशाल पाटलांवर शिवसेनेचा अन्याय"; भाजपचे केंद्रीय मंत्री काय बोलून गेले...

World Hunger : काही देशांच्या युद्धामुळे जगभरात वाढले उपासमारीचे संकट; काय आहे परिस्थिती?

SCROLL FOR NEXT