shashank ketkar 
मनोरंजन

'मला शिव्या खायला तयार राहावं लागणार आहे'; शशांक केतकरने असं केलं तरी काय?

स्वाती वेमूल

मालिकांमधील लोकप्रिय अभिनेता शशांक केतकर याची सोशल मीडियावरील एक पोस्ट नुकतीच चर्चेत आली आहे. शशांकने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला असून त्याच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिलं, 'मला शिव्या खायला तयार राहावं लागणार आहे.' यामागचं कारण म्हणजे शशांकची नवी मालिका. या मालिकेत तो पहिल्यांदाच नकारात्मक भूमिका साकारणार आहे. 

२०१३ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आलेली 'होणार सून मी या घरची' ही मालिका प्रचंड गाजली. या मालिकेतून शशांक घराघरात पोहोचला आणि आता तरुणींच्या गळ्यातील ताईत असलेला 'श्री' म्हणजेच शशांक मालिकेत पुनरागमन करतोय. झी मराठी वाहिनीवरील 'पाहिले न मी तुला' या मालिकेत तो समरप्रताप या व्यक्तीची नकारात्मक भूमिका साकारतोय. या मालिकेत 'माझा होशील ना' या मालिकेतून घराघरात पोहोचलेला डॉ. सुयश पटवर्धन अर्थात आशय कुलकर्णी प्रमुख भूमिकेत आहे. तर त्यासोबत तन्वी मुंडले हा नवीन चेहरा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. शशांकने या मालिकेचा प्रोमो पोस्ट करत लिहिलं, 'कदाचित मला शिव्या खायला तयार राहावं लागणार आहे. एक अभिनेता म्हणून टेलिव्हिजनवर फार कमी वेळा असे एक्सपरिमेंट्स करायला मिळतात. या खतरनाक संधीसाठी झी मराठी, आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कोठारे तुमचे खूप आभार.'

मानसी आणि अनिकेतच्या अतूट प्रेमाची आणि विश्वासाची कथा या मालिकेत दाखवण्यात येणार आहे. या दोघांचं प्रेम लग्नबंधनात अडकण्याआधी समरच्या विक्षिप्त नजरेत येतं. तिथूनच मानसी आणि अनिकेतच्या आयुष्यातील ससेहोलपट सुरू होते. पाठीवर छुपे वार करणाऱ्या नीच प्रवृत्तीच्या समरला अनिकेत-मानसी कसे सामोरे जातील हे मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळेल. ही मालिका १ मार्च पासून सोमवार ते शनिवार संध्याकाळी ७ वाजता झी मराठी वाहिनीवर प्रसारित होणार आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dr. Jaysingrao Pawar Passes Away: छत्रपतींचा इतिहास उजळवणारा संशोधक हरपला; डॉ. जयसिंगराव पवार यांचे निधन

Satara ZP Controversy: सातारा झेडपीतील गोंधळाचे मंत्री गोरेच सूत्रधार: देसाई, मांडवे; आमचा एन्काउंटर करण्याचा पोलिसांचा होता डाव!

US Iran Conflict : मोठा दिलासा ! गॅस तुटवड्याचं संकट टळणार, इराणने भारतासाठी खुली केली होर्मुझची सामुद्रधुनी

लाडक्या बहिणींना मिळणार ४५०० रुपये! एप्रिलमध्ये ज्यांना मिळेल लाभ, त्यांचाच सुरु राहणार लाभ; ‘ई-केवायसी’तील दुरुस्तीसाठी ३१ मार्च मुदत, वाचा...

Panchang 26 March 2026 : दत्त कवच स्तोत्राचे पठण आणि ‘बृं बृहस्पतये नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT