Rajkummar Rao  Esakal
मनोरंजन

Rajkummar Rao: राज आता पाळणा केव्हा हलणार, शहनाजच्या 'त्या' प्रश्नावर अभिनेत्याचं कडक उत्तर व्हिडिओ व्हायरल..

सकाळ डिजिटल टीम

बॉलीवूडमध्ये आपल्या दमदार अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात वेगळचं स्थान निर्माण केल आहे. नुकताच त्याचा भीड हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर रिलिज झाला होता. हा चित्रपट काही खास कमाई करु शकला नसला तरी त्याच्या चित्रपटातील अभिनयाचं कौतुक मात्र खुप झालं. कमी वेळातच राजकुमार रावने इंडस्ट्रीत आपली एक खास ओळख निर्माण केली आहे. एवढेच नाही तर चाहते राजकुमारच्या अभिनयाचे खूप कौतुक करतात.

राजकुमार आणि त्याची पत्नी पत्रलेखा हे बॉलिवूडमधील पॉवर कपल्सपैकी एक आहेत. बऱ्याचकाळ एकमेकांना डेट केल्यानंतर राजकुमार राव आणि पत्रलेखा यांनी नोव्हेंबर २०२१ मध्ये लग्न केले.

लग्न झाल्यापासून पत्रलेखा आणि राजकुमार राव सोशल मीडियावर या जोडप्याचे बरेच व्हिडिओ व्हायरल होत असतात. अशातच दोघांच्या चाहत्यांना त्यांना लवकरच आई-वडील झालेलं पहायचं आहे.

या संदर्भात शहनाज गिलच्या शो 'देसी वाइब्स विथ शहनाज गिल'ची एक क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये राजकुमार राव बेबी प्लॅनिंगवर बोलला आहे.

शहनाजच्या या प्रसिद्ध शो मध्ये जेव्हा शहनाज गिलने राजकुमारला विचारले की, तू बाळाची प्लानिंग कधी करत आहे, तेव्हा राजकुमार खुप लाजतो आणि म्हणतो की, मी बेबीची प्लनिंग कधी करत आहे, असा प्रश्न माझ्या कुटुंबातील सदस्यही मला विचारत नाहीत... मी अजून याबद्दल विचार केलेला नाही, मला वाटते की मी स्वतः अजूनही एक छोटा बेबी आहे.

राजकुमार राव पुढे म्हणातो की, जर तो बेबी प्लनिंग करेल तर त्याला मुलगी हवी आहे. ती कशी असावी याबद्दल बोलतांना तो म्हणतो की, मला मुलगी असेल तर ती तुझ्यासारखी, बिंदास, गोड आणि साधी असावी असं मला वाटतं.

सध्या दोघांचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. राजकुमारचे चाहते त्याला वारंवार कमेंटही करत आहेत.

राजकुमार राव शेवटचा 'भिड' या चित्रपटात दिसला होता. तो 24 मार्च रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. राजकुमार रावचा हा चित्रपट कोरोनाच्या काळात देशात लॉकडाऊनची कहाणी दाखवतो.

या चित्रपटाचे दिग्दर्शन बॉलिवूडचे प्रसिद्ध चित्रपट निर्माता अनुभव सिन्हा यांनी केले आहे. राजकुमार राव व्यतिरिक्त बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री दिया मिर्झा आणि भूमी पेडणेकर, अभिनेता पंकज कपूर 'भिड'मध्ये मुख्य भूमिकेत आहे. याच चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यानचा हा व्हिडिओ आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सरकारचं हेच महागाई नियंत्रणाचं सूत्र, शरद पवारांचा गॅस दरवाढीवरून टोला; शेवटी इशाराही दिला

26/11 वेळी 20 गरोदर महिलांचे प्राण वाचवणारी ती परिचारिका कोण ? कंगनाने साकारलीय भूमिका

Photos : 1000 वर्षे जुनी प्राचीन शिलालेखांची कलाकृती सापडली; काळाच्या ओघात दडलेला 7व्या- 8व्या शतकाचा इतिहास, फोटो व्हायरल

Latest Marathi News Live Update : नवनीत राणा यांना राष्ट्रवादी काँग्रेस कडून उमेदवारी नाही

Mumbai: मुंबईत लाइव्ह कॉन्सर्टमध्ये तरुणाचा संशयास्पद मृत्यू, मित्र-मैत्रिणींसोबत मद्यपान केले अन्...; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT