'बिग बॉस १३' फेम अभिनेत्री शहनाज गिलने (Shehnaaz Gill) शनिवारी तिच्या मॅनेजरच्या साखरपुड्याला हजेरी लावली. या कार्यक्रमाला इंडस्ट्रीतील इतरही काही सेलिब्रिटी उपस्थित होते. कार्यक्रमातील काही फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडीओमध्ये शहनाज 'झिंगाट' या गाण्यावर कश्मीरा शहा, अरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जिया अँड्रियानी आणि इतरांसोबत डान्स करताना पहायला मिळतेय. अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या (Siddharth Shukla) निधनानंतर शहनाजने कुठल्याही कार्यक्रमात जाणं किंवा माध्यमांसमोर येणं टाळलं होतं.
मॅनेजर कौशल जोशीच्या साखरपुड्यात सर्व सेलिब्रिटींनी थीमनुसार काळ्या रंगाचे कपडे परिधान केले होते. शहनाजने काळ्या रंगाचा चमकता रॅप-अराऊंड ड्रेस परिधान केला होता. कार्यक्रमातील शहनाजचे फोटो, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेक चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला. 'तिला पुन्हा हसताना पाहून बरं वाटतंय', असं एकाने लिहिलं. तर 'तू अशीच हसत रहा' असं दुसऱ्याने म्हटलं. इशान खट्टरच्या 'धडक' या चित्रपटातील 'झिंगाट' गाण्यावर सर्व सेलिब्रिटी नाचतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने सिद्धार्थचं निधन झालं होतं. सिद्धार्थ आणि शहनाज एकमेकांचे खूप चांगले मित्र होते. 'सिडनाज' असं नाव या दोघांच्या चाहत्यांनी त्यांना दिलं होतं. सिद्धार्थसाठीचा शहनाजचा 'तू यही है' हा म्युझिक व्हिडीओ काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. या व्हिडीओमध्ये सिद्धार्थच्या अनेक आठवणी चाहत्यांना पहायला मिळाल्या. शहनाजचा 'होंसला रख' हा पंजाबी चित्रपटसुद्धा ऑक्टोबरमध्ये प्रदर्शित झाला. यामध्ये तिने दिलजित दोसांज, सोनम बाजवा आणि शिंदा ग्रेवाल यांच्यासोबत भूमिका साकारली होती.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.