Ganesh Chaturthi 2022: Shehnaaz Gill seen with sidharth shukla esakal
मनोरंजन

Ganesh Chaturthi: शहनाज गिलनं केलं लालबागच्या राजाचं दर्शन, सिद्धार्थ शुक्ला दिसला अन्...

लालबागच्या राजाच्या दर्शनाला शहनाज पोहोचली अन् सगळ्यांची नजर सिद्धार्थवर

सकाळ डिजिटल टीम

सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूनंतर शहनाजबाबत टेलिव्हिजन क्षेत्राबरोबरच चाहत्यांकडूनही हळहळ व्यक्त केली गेली. मात्र सिद्धार्थ मुळात शहनाजच्या हृदयात कायम जिवंत आहे असे शहनाजचे म्हणणे होते. गणेशोत्सवाच्या निमित्तानं जेव्हा लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यास शहनाज पोहोचली तेव्हा सिद्धार्थला तिच्या सोबत बघून लोक भावूक झाले. यावेळी शहनाजच्या हातावरील असलेल्या सिद्धार्थच्या टॅटूने सर्वाचे लक्ष वेधून घेतले. सिद्धार्थ आता या जगात जरी नसला तरी शहनाजने त्याचा चेहरा तिच्या हातावर कोरून घेतलाय. (Ganesh Chaturthi 2022: Shehnaaz Gill seen with sidharth shukla)

लालबागच्या राजाच्या दर्शनाला शहनाज

गणपती बाप्पाच्या दर्शनाला शहनाज तिचा भाऊ शाहबाजसह आली होती. सिद्धार्थ हयात नसला तरी सिद्धार्थचा टॅटू शहनाजला त्याच्या जिवंतपणाची जाणीव करून देतो. लालबागच्या दर्शनादरम्यान पापराझीची नजर शहनाजच्या हातावर असलेल्या सिद्धार्थच्या टॅटूवर पडली. शहनाज आणि भाऊ शाहबाजचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. या फोटोमध्ये शहनाज सुंदरश्या पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये आली होती.

शहनाजच्या साध्या ड्रेसमधील लुकनेही यावेळी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले होते. शहनाज आणि सिद्धार्थ शुक्ला सलमानच्या बिग बॉस शोमधून लाइमलाइटमध्ये आलेत. एक आयडीयल कपल म्हणून शहनाज आणि सिद्धार्थला ओळखले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

Supreme Court March : राहुल गांधींनी व्हिडिओ शेअर करत दिली देशवासियांना 'चलो दिल्ली'ची हाक; सरन्यायाधीशांकडे दाद मागणार

SCROLL FOR NEXT