Shehbaz Badesha  
मनोरंजन

शहनाजच्या भावाने सिद्धार्थच्या चेहऱ्याचा काढला टॅटू; पहा व्हिडीओ

सिद्धार्थची आठवण कायम स्वत:सोबत ठेवण्यासाठी शेहबाजने हा टॅटू काढला आहे.

स्वाती वेमूल

अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या Sidharth Shukla निधनाचं दु:ख पचवणं अजूनही त्याच्या चाहत्यांसाठी सोपं नाही. सोशल मीडियावर दररोज त्याच्या आठवणी पोस्ट केल्या जातात. सिद्धार्थच्या निधनानंतर शहनाज गिल Shehnaaz Gill पूर्णपणे खचली आहे. काही दिवसांपूर्वीच शहनाजच्या वडिलांनी तिच्या नावाचा टॅटू हातावर काढला होता. त्यानंतर आता शहनाजच्या भावाने सिद्धार्थच्या चेहऱ्याचा टॅटू हातावर काढला आहे. सिद्धार्थची आठवण कायम स्वत:सोबत ठेवण्यासाठी शेहबाज बादेशाने हा टॅटू काढला आहे. त्याचा फोटो आणि व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

तुझ्या आठवणी तुझ्यासारख्याच खऱ्या असतील. तू नेहमी माझ्यासोबत जिवंत राहशील, आमच्या आठवणींमध्ये जिवंत राहशील, असं कॅप्शन त्याने या फोटोला दिलं आहे. हातावर सिद्धार्थचा चेहरा आणि त्याखाली शहनाज असं नाव लिहिलेलं या फोटोमध्ये दिसतंय. या फोटोच्या कॅप्शनमध्ये अनेकांनी कमेंट करत त्याला शहनाजची काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.

सिद्धार्थच्या जाण्यानं शहनाज मोठ्या मानसिक धक्क्यात आहे. तिला त्यातून बाहेर काढण्यासाठी तिची आई काळजी घेत आहे. सिद्धार्थ शुक्लाने वयाच्या ४०व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने सिद्धार्थचे २ सप्टेंबर रोजी निधन झाले. 'बालिका वधू' या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेला सिद्धार्थ 'बिग बॉस १३'चा विजेता ठरला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुढील ५ वर्षांत अब्जावधी लोकांकडे असेल स्वतःचा AI एजंट; मार्क झुकरबर्गचा मोठा दावा!

Mumbai Crime: धक्कादायक! अकाली बाळाला जन्म दिला आणि कचरापेटीत टाकलं, १९ वर्षीय अविवाहितेचं कृत्य

Latest Marathi News Live Update : चाकण-शिक्रापूर मार्गावर कंटेनर बंद पडण्याचे प्रकार वाढले; वाहतूक पूर्णपणे जाम

Ajinkya Rahane: रहाणेच्या निवृत्तीनंतर रोहित शर्मा भावुक; 'एकाच ड्रेसिंग रूममध्ये अनेक वर्षे...' म्हणत व्यक्त केल्या भावना म्हणाला...

Khadakwasla Dam Water Discharge : पुणेकरांनो सावधान! दुपारी 12 वाजता खडकवासल्यातून 22,880 क्युसेकने विसर्ग; मुठा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा, धरणाच्या साखळीत 'मुसळधार'

SCROLL FOR NEXT