Shehnaaz Gill's fan travels 16 hours from USA just to meet her, breaks down in tears after hugging her sakal
मनोरंजन

Shehnaaz Gill: तुझ्यासाठी कायपण! 16 तासांचा विमान प्रवास फक्त शहनाजला भेटण्यासाठी..

पंजाबची कतरिना 'शहनाज गिल'ला भेटायला चक्क कॅलिफोर्नियावरुन आले फॅन्स..

नीलेश अडसूळ

बिग बॉस सीझन 13 मधून जबरदस्त लोकप्रियता मिळवलेली पंजाबची कतरीना म्हणजेच शहनाज गिल आता हिंदी मनोरंजन सृष्टीतही चांगलेच नाव मिळवत आहे. अत्यंत कमी वेळात शहनाजला प्रचंड लोकप्रियता मिळाली. शहनाजच्या स्वभावाचे, तिच्या वागणूकीचे नेहमीच कौतुक होत असते. तिचे फॅन फॉलोइंग जबरदस्त आहे. इतके की तिला भेटण्यासाठी एक फॅन चक्क अमेरिकेतून दुबईमध्ये तिला भेटण्यासाठी पोहोचली. सध्या हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.

(Shehnaaz Gill's fan travels 16 hours from USA just to meet her, breaks down in tears after hugging her)

कुणालाही विश्वास बसणार नाही शहनाजचे फॅन्स तिला भेटण्यासाठी चक्क सातसमुद्र पार करून पोहोचले. शहनाज सध्या दुबईमध्ये एका कार्यक्रमासाठी गेली आहे. तिची इतकी फॅन फॉलोइंग जबरदस्त आहे, याचं ताजं उदाहरण एका व्हिडिओवरुन समोर आलं आहे. दुबईमध्ये तिला भेटण्यासाठी फॅन्सनी गर्दी केली. केवळ दुबईतील फॅन्सच नाही तर चक्क कॅलिफोर्निया वरून म्हणजेच अमेरिकेतून १६ तासाचा प्रवास करून एक फॅन तिला भेटायला आली. याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

शहनाजला पाहून तिच्या फॅनला आनंद तर झालाच पण शहनाजने त्यांना मिठी मारताच त्यांचे अश्रु अनावर झाले. एवढेच नही तर चाहत्यांचे असे प्रेम पाहून शहनाजचेही डोळे पाणावले. तिला भेटायला आलेल्या फॅनला इतका आनंद झाला होता की, त्या म्हणत होत्या, "मी शहनाजची फॅन आहे, तिच्यासाठी काही करू शकते".

शहनाज सध्या बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानसोबत 'किसी का भाई, किसी की जान' या चित्रपटात दिसणार आहे. शिवाय शहनाज गिलने तिचा चॅट शो 'देसी वाइब्स' सुरू केला आहे ज्यामध्ये तिने पाहुणे राजकुमार राव यांच्याशी पहिल्यांदा खुलेपणाने संवाद केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi: मोदी सरकारमधील कोणत्या मंत्र्याने सर्वात वाईट कामगिरी केली? ५ मंत्र्यांची यादी तयार; खुद्द पंतप्रधानांनीच घेतली बैठक

शुभमन गिलचा IPL 2026 मधील बेस्ट कॅच... शिवम दुबेला माघारी पाठवून फिरवली मॅच Video Viral

Latest Marathi News Live Update : फोंडा घाटातून वाहतुकीवरील निर्बंध दहा जूनपर्यंत कायम

आधी घर आणि आता अलिशान गाडी! महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्याने खरेदी केली नवी कोरी कार, किंमत ऐकून थक्क व्हाल

Solapur OBC Hostel News: विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! वसतिगृह प्रवेश नियमित, ५१०० रुपये निर्वाह भत्ता मंजूर, आमदार विजयकुमार देशमुख यांच्या पाठपुराव्याला यश

SCROLL FOR NEXT