Shehnaaz Gill with father  
मनोरंजन

शहनाज गिलच्या वडिलांवर गोळीबार; हल्लेखोर पसार

अमृतसरमधील एका कार्यक्रमातून घरी परतत असताना त्यांच्यावर हा हल्ला झाला.

स्वाती वेमूल

बिग बॉस १३ फेम अभिनेत्री शहनाज गिलचे (Shehnaaz Gills) वडील संतोष सिंग सुख (Santok Singh Sukh) यांच्यावर दोघांनी गोळ्या झाडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शनिवारी रात्री ८.३०च्या सुमारास दुचाकीस्वारांनी संतोष सिंग सुख यांच्यावर गोळीबार केला. अमृतसरमधील एका कार्यक्रमातून घरी परतत असताना त्यांच्यावर हा प्राणघातक हल्ला झाला. संतोष यांच्या ड्राइव्हरने वॉशरुमला जाण्यासाठी त्यांची कार एका ढाब्याजवळ उभी केली होती. ड्राइव्हर कारमधून उतरल्यानंतर ते एकटे असताना दोघांनी त्यांच्या जवळ येऊन गोळीबार केली. त्यांच्या कारला चार गोळ्या लागल्या. सुदैवाने त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही.

संतोष सिंग यांचे सुरक्षारक्षक गाडीजवळ आल्यावर हल्लेखोर पळून गेले. संतोष सिंग यांनी तक्रार दाखल केली असून या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत. संतोष सिंग यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपात प्रवेश केला आहे.

शहनाज गिल ही पंजाबमधील प्रसिद्ध अभिनेत्री आणि गायक आहे. 'बिग बॉस १३' या शोमध्ये भाग घेतल्यानंतर ती चर्चेत आली. सिद्धार्थ शुक्ला या तिच्या जवळच्या मित्राच्या निधनानंतर शहनाज सोशल मीडियापासून बरेच दिवस दूर होती. आता पुन्हा एकदा ती सक्रीय होऊ लागली आहे. नुकतंच तिने तिच्या मॅनेजरच्या साखरपुड्याला हजेरी लावली होती. या कार्यक्रमातील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'बिघाडी'वर मतदारांचा बुलडोझर! पाली पोटनिवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेचा झेंडा फडकला; शेकाप-भाजप-राष्ट्रवादी समीकरण कोसळले

vaibhav sooryavanshi च नाही, तर भारताच्या बाकी फलंदाजांनीही श्रीलंकन गोलंदाजांना झोडलं अन् उभं केलं डोंगराएवढं लक्ष्य

'पहिलीच डेट आणि समीरला माझ्यासमोरच पॅनिक अ‍ॅटक आला' अशी होती नीलम कोठारी-समीर सोनीची पहिली भेट

Video: पवारांच्या खासदाराचा नादच वेगळा! खऱ्याखुऱ्या 'टायगर'च्या गळ्यात पट्टा बांधून मारला फेरफटका; व्हिडीओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : रायगडमध्ये 30 जूनपर्यंत स्विमिंग पूल बंद

SCROLL FOR NEXT