Shehnaaz Gill Gifts A Swanky Mercedes-Benz E-Class Worth Rs. 89 Lakhs To Her Brother  Esakal
मनोरंजन

Shehnaaz Gill: रक्षाबंधनानिमित्त शहनाजनं भावाला गिफ्ट केली महागडी आलिशान कार

भावाला महागडी आलिशान कार देण्यासोबतच शहनाज गिलने नुकतेच मुंबईत एक लक्झरी अपार्टमेंटही खरेदी केले आ

Vaishali Patil

Shehnaaz Gill: बिग बॉसमधुन घराघरात लोकप्रिय झालेली अभिनेत्री शहनाज गिल ही नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. नुकतिच शहनाज सलमान खानच्या किसी का भाई किसी की जान या चित्रपटात दिसली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल करु शकला नसला तरी त्या चित्रपटीतील शहनाजच्या अभिनयानं चाहत्यांची मन जिंकली.

शहनाज गिल ही इंडस्ट्रीतील सर्वात हुशार आणि लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. शहनाज आज पुन्हा चर्चेत आले आहे. त्याचं कारण म्हणजे तिने तिच्या भावाला एक अप्रतिम भेट दिली आहे. तिनं तिचा भाऊ शाहबाज बदेशाला एक नवीन मर्सिडीज कार भेट दिली आहे.

ज्याचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. शाहबाजने देखील त्याच्या सोशल मिडियावर हँडलवर हा व्हिडिओ शेयर केला होता.

शाहबाज हा गायक आहे. तो स्वत:चं यूट्यूब चॅनल देखील चालवतो. कार सोबतचा व्हिडिओ शेयर करत शाहबाज कॅप्शनमध्ये, 'नव्या कारसाठी लाडकी बहिण शहनाज गिलचे आभार.' असं लिहिलं आहे. याचे फोटो आणि व्हिडिओ देखील त्याने शेयर केले आहे.

(Shehnaaz Gill Gifts A Swanky Mercedes-Benz E-Class Worth Rs. 89 Lakhs To Her Brother)

Mercedes-Benz E-class कार शहनाजनं भावाला गिफ्ट केली आहे. या कारची किंमत 74.95 लाख ते 88.86 लाख रुपये आहे. शहनाजनं नुकतचं मुंबईत नवीन घर घेतले होतं. आता तिनं भावाला कार गिफ्ट केली आहे.

शहनाज सध्या तिच्या आगामी प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे. ती अनेक फॅशन शोमध्येही दिसते. त्याचबरोबर तिचं स्वत:चं यूट्यूब चॅनल आहे, ज्यावर ती अनेक मोठमोठ्या सेलिब्रिटींची मुलाखत घेत असते.

येत्या काही दिवसांत शहनाज रिया कपूरचा पती करम बुलानी दिग्दर्शित चित्रपटात दिसणार आहे. मात्र, या चित्रपटाचं टायटल अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. निखिल अडवाणी या चित्रपटाचे निर्माता-दिग्दर्शन करणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ताडोबातील खाण प्रकल्पाला अखेर मंजुरी; राज्य वन्यजीव मंडळातील सदस्यांचा विरोध डावलत सरकारचा निर्णय...

Kolhapur : आईच्या शेवटच्या साडीने वाचले दीड लाख; सय्यद कुटुंबाची आयुष्याची पुंजी भस्मसात, दिवसभर कचऱ्यात राबणारे हात थरथरले

Latest Marathi News Live Update : काँग्रेसचा जाहीरनामा जाहीर केला जाणार

Amravati fire: टर्पेंटाइन पॅकिंग उद्योगात आग; एक ठार, अमरावती एमआयडीसीमधील धक्कादायक घटना, मृत महिला वर्धेची!

Hinjewadi News : हिंजवडीत संगणक अभियंत्याने आईला मेसेज करून संपविले जीवन

SCROLL FOR NEXT