Sher Khul Gaye Fighter song Hrithik Roshan esakal
मनोरंजन

Fighter song Sher Khul Gaye : 'शेर खुल गये पाहून होश उड गये'! ह्रतिकचा असा डान्स यापूर्वी पण पाहिलाय का?

शेर खुल गये हे गाणं आता सोशल मीडियावर प्रदर्शित झालं असून त्याला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे.

युगंधर ताजणे

Sher Khul Gaye Fighter song Hrithik Roshan : बॉलीवूडचा स्टार अभिनेता ह्रतिक रोशन आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण यांच्या फायटर चित्रपटातील चर्चेतलं शेऱ खुल गये नावाचं गाणं सोशल मीडियावर प्रदर्शित झालं असून त्याला नेटकऱ्यांचा, चाहत्यांचा जबरदस्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे. सिद्धार्थ आनंद यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट २५ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

शेर खुल गये हे गाणं आता सोशल मीडियावर प्रदर्शित झालं असून त्याला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. त्यात नेहमीप्रमाणे ह्रतिकच्या डान्सचे कौतुक होत आहे. त्यात दीपिकाला फारशी संधी मिळाली नसली तरी तिच्या स्टाईल आणि लूकची चर्चा होत आहे. त्याला चाहत्यांनी दाद देत वेगवेगळ्या कमेंटही केल्या आहेत.

या सगळ्यात ह्रतिकचे ते शेर खुल गये हे गाणं ऐकल्यावर काही नेटकऱ्यांनी त्यावर असं गाणं यापूर्वी ऐकल्याच्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. ह्रतिकचा पूर्वी बँग बँग नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यात त्याच नावाचं एक गाणंही होतं. त्या गाण्यासारखी या चित्रपटातील गाण्याची चाल आहे की काय अशी शंका शेर खुल गये ऐकल्यावर वाटून जाते. बाकी ह्रतिकच्या डान्सनं यामध्ये नेहमी सारखीच कमाल केली आहे.

ह्रतिक आणि दीपिकानं त्यांच्या इंस्टा हँडलवरुन ते गाणं शेयर केलं असून त्याला जोरदार प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले आहे. दीपिका आणि ह्रतिकनं त्या चित्रपटामध्ये एअर फोर्स अधिकाऱ्याची भूमिका वठवली आहे. शेर खुल गये विषयी सांगायचे झाल्यास ते गाणं विशाल आणि शेखर, बेनी दयाल आणि शिल्पा राव यांनी गायलं आहे. विशाल शेखरनचं ते संगीतबद्ध केलं आहे.

दीपिकानं सिद्धार्थ आनंद यांच्यासोबत पूर्वी काही फिल्म्स केल्या आहेत. त्यात २००८ मध्ये बचना ये हसीनो आणि २०२३ मध्ये आलेला किंग खान सोबतचा पठाण यांचा समावेश आहे. त्यात दीपिका आणि जॉन अब्राहम यांच्याही भूमिका होत्या. सिद्धार्थ यांचा पठाण हा बॉक्स ऑफिसवर प्रचंड यशस्वी झाला होता. त्यानं चाहत्यांची वाहवा मिळवली होती. तसेच तो वादाचा विषयही ठरला होता.

ह्रतिक आणि दीपिका फायटरच्या माध्यमातून पहिल्यांदाच एकत्र येत आहेत. त्यांच्या या चित्रपटाची प्रेक्षकांना, चाहत्यांना कमालीची उत्सुकता आहे. तसेच ह्रतिक आणि सिद्धार्थ आनंद यांनी यापूर्वी २०१४ मध्ये बँग बँग आणि २०१९ मध्ये वॉर नावाच्या चित्रपटामध्ये काम केले होते. आता त्यांच्या फायटर नावाच्या चित्रपटाची जोरदार चर्चा रंगली आहे. त्यामध्ये दीपिका, ह्रतिक, अनिल कपूर, करण सिंग ग्रोव्हर आणि अक्षय ऑबेरॉय यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran–Israel war: इराणवरील हल्ल्यात एक हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू; सरकारने दिली सर्व माहिती

अखेर तो क्षण येणार! पारू अन् आदित्यचं लग्न होणार; पूजेच्या दिवशी मालिकेत येणार मोठा ट्विस्ट, वाचा पुढे काय होणार

School Education : अखेर बोडखा येथे नववीचा वर्ग सुरू; सकाळच्या वृत्ताने उडाली होती खळबळ

Karad News : सहकार खात्याचे लेखी उत्तर म्हणजे मागण्यांबाबत टोलवाटोलवी; गटसचिवांचा आरोप

Dog Saves Mandi Villagers : केवळ एका कुत्र्यामुळे वाचला हिमाचलमधील ६० पेक्षा जास्त गावकऱ्यांचा जीव, जाणून घ्या कसा?

SCROLL FOR NEXT