Sherlyn Chopra news  esakal
मनोरंजन

Sajid Khan Fir: 'साजिद तुला सोडणार नाय'! शर्लिन पोलीस ठाण्यात

टीव्ही अभिनेत्री शर्लिन चोप्रा आणि साजिद खानमधील वाद हा आता वाढताना दिसतो आहे.

सकाळ डिजिटल टीम

Sherlyn Chopra on Sajid Khan: टीव्ही अभिनेत्री शर्लिन चोप्रा आणि साजिद खानमधील वाद हा आता वाढताना दिसतो आहे. साजिदच्या विरोधात अगोदरच अनेकांनी नाराजी व्यक्त केली असताना त्यात शर्लिनच्या नावाची भर पडली आहे. बिग बॉसच्या 16 व्या सीझनमध्ये साजिदनं अनेकांना आपल्याविषयी भाग पाडले आहे. यापूर्वी बऱ्याचजणांनी साजिदला त्या शोमधून बाहेर काढा अशी मागणी करण्यात आली आहे.

शर्लिननं तर साजिदला बिग बॉसमधून बाहेर काढावे म्हणून पोलीस ठाण्यात धाव घेतल्याचे दिसून आले आहे. शर्लिननं तिच्या इंस्टावरुन एक पोस्ट व्हायरल केली आहे. त्यामध्ये तिनं पोलिसांना बिग बॉस शोवर नाराजी व्यक्त केली आहे. साजिदच्या विरोधात नाराजी व्यक्त करुन काही केल्या त्याला त्या शोमधून बाहेरचा रस्ता दाखवा असे म्हटले आहे. यावेळी शर्लिननं काही मीडियावाल्यांशी बातचीत देखील केली आहे.

त्या व्हायरल झालेल्या मुलाखतीमध्ये शर्लिन म्हणाली, महिलांना त्रास देण्यासाठी साजिद ओळखला जातो. त्यानं अनेकांना खूप त्रास दिला आहे. त्याला बिग बॉसमध्ये राहण्याचा काही हक्क नाही. त्याच्यावर अनेकांनी वेगवेगळे आरोपही केले आहेत. मी पोलिसांकडे यासाठी आले होते की, त्याला त्या शोमधून निर्मात्यांनी बाहेर काढावे. साजिदवर मी टू चे आरोप आहेत. अशावेळी त्याला बिग बॉसच्या शोमध्ये का स्थान देण्यात आले असा प्रश्न शर्लिननं याप्रसंगी उपस्थित केला आहे.

निर्माते काही ऐकायला तयार नाही. ते साजिदला काढण्यास नकार देत आहे. त्यांना आमची काळजी नाही. त्यामुळे मी आता केंद्रीय सुचना आणि माहिती प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांना देखील पत्र लिहून साजिदविषयी तक्रार करणार आहे. अशा शोवर बंदी आणावी असे त्यांना सांगणार आहे. ज्या कार्यक्रमामध्ये महिलांवर अन्याय अत्याचार करणारा साजिद आहे त्याला त्या शोमध्ये स्थान दिले जाते. तेव्हा तो शो च बंद करावा असे त्यांना लेखी निवेदन देणार असल्याचे सांगणार असल्याचे शर्लिननं म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कार आणि सिमेंट मिक्सर ट्रकची भीषण धडक; ११ जणांचा जागीच मृत्यू; कल्याण अहिल्यानगर हायवेवर दुर्घटना

"इंडस्ट्रीतून हाकलून द्यावं इतका मी बेशिस्त वागलो" आस्ताद काळेने उघड केली कठीण काळाची आठवण; म्हणाला..

Latest Marathi News Live Update: दिल्ली विधानसभेला बॉम्बने उडवण्याची धमकी

Strait of Hormuz: शेवटच्या क्षणी काय घडलं? पाकिस्तानमधील बैठक का फिस्कटली? इराणने सांगून टाकलं

पुण्यात PhD करणाऱ्या तरुणीनं संपवलं आयुष्य, प्राध्यापकाने २ दिवसांपूर्वी स्टॅम्पवर लिहून दिलेलं चूक झाली; चिठ्ठीत लिहिलं कारण

SCROLL FOR NEXT