vidya vijay
vidya vijay 
मनोरंजन

विद्या बालनच्या सिनेमातून विजय राज यांना डच्चू, नवीन अभिनेत्याच्या शोधात निर्माते मात्र बजेटचे तीनतेरा

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ

मुंबई- अमित मासुरकर यांच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेल्या विद्या बालनचा आगामी सिनेमा 'शेरनी'च्या निर्मात्यांवर बजेटचं एक मोठं ओझं वाढणार आहे. या सिनेमामध्ये महत्वाची भूमिका साकारणारे अभिनेते विजय राज यांना छेडछाड केल्या प्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. यासाठी निर्मात्यांनी विजय यांना सिनेमातून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. आता निर्मात्यांना त्यांचा सिनेमा पुन्हा एकदा शूट करणं गरजेचं आहे. 

'शेरनी' सिनेमाच्या दुसरं शेड्युल काही दिवसांपूर्वीच बालाघाटमध्ये सुरु झालं होतं. याआधी या सिनेमाचं शूटींग लॉकडाऊनच्या आधी मार्च महिन्यात झालं होतं. तेव्हापासून विजय राज या सिनेमाचा भाग होते. आता त्यांना सिनेमातून काढून टाकण्यात आलं आहे. यासाठी निर्मात्यांना काही सीन्स पुन्हा एकदा शूट करावे लागणार आहेत ज्यामध्ये विजय राज उपस्थित होते. याचा हिशोब केल्यास प्रोडक्शन हाऊसला दररोजचं जवळपास २० लाख रुपयांचं नुकसान सहन करावं लागणार आहे.

सिनेमाच्या कथेत कोणताही बदल केला गेला नसला तरी विजय राज यांच्या जागी दुस-या अभिनेत्याला त्याच्या जागी घेतलं जाणार आहे. २९ ऑक्टोबरला 'शेरनी' सिनेमाच्या शूटींग दरम्यान सेटवर विजय राज यांच्यावर एका सहाय्यक दिग्दर्शकाने विजयने गैरवर्तन करत चुकीच्या पद्धतीने हात लावल्याचा आरोप केला आहे. मात्र विजय यांनी आपण केवळ खांद्यावर हात ठेवला होता आणि माझ्या भावना चुकीच्या नसल्याचं म्हटलं आहे. मात्र जेव्हा प्रोडक्शनने त्यांच्यावर दबाव टाकला तेव्हा त्यांनी पिडितेची माफी मागितली.

विजय यांनी माफी मागितल्यानंतरही पिडितेची खात्री पटली नाही म्हणून तिने विजय यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. मात्र विजय यांची मंगळवारी लगेचच जामिनावर सुटका करण्यात आली. सिनेमाची शूटींग सुरु आहे मात्र विजय आता या सिनेमाचा भाग नाहीत.    

sherni film makers has removed vijay raaz from the vidya balan film 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha election 2024 : ''आम्ही खोक्यांच्या मागे गेलो नाहीत; कारण...'', 'सकाळ'च्या मुलाखतीत विनायक राऊत स्पष्टच बोलले

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : धोनी गोल्डन डक; जडेजामुळे चेन्नईने मारली 168 धावांपर्यंत मजल

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेचा भगवान कुबेरांशी काय संबंध आहे? जाणून घ्या कारण

Job Discrimination : मुंबईत नोकरीसाठी मराठी माणसालाच नो एन्ट्री करणाऱ्या कंपनीला शिकवला धडा, एचआरने मागितली माफी!

Latest Marathi News Live Update : ठाणे, रायगडला उष्णतेचा एलो अलर्ट

SCROLL FOR NEXT