Farhan Akhtar, Shibani Dandekar-Akhtar Instagram
मनोरंजन

''मी स्त्री आहे,मी प्रेग्नेंट..'' शिबानीच्या व्हिडीओची रंगली चर्चा

शिबानीच्या एका फोटोवरुन 'ती प्रेग्नेंट आहे का?',असा प्रश्न तिला विचारला जात होता.

प्रणाली मोरे

फरहान अख्तर(Farhan AKhtar)-शिबानी दांडेकर(Shibani Dandekar) यांच्या विवाहाला जेमतेम दहा दिवस झाले आहेत. त्याचं लग्न हे बी-टाऊनच्या चर्चेतील लग्नांपैकी एक ठरलं. अर्थात दोघांनी अत्यंत मोजक्याच नातेवाई-मित्रपरिवाराच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधली असली तरी लग्नातील विविध सोहळे हे त्याचं आकर्षण ठरले आहेत. खंडाळा येथील जावेद अख्तर यांच्या फार्म हाऊसवर शिबानी-फरहाननं लग्नगाठ बांधली. त्यांचा लग्नासोहळा कसा पार पडेल याची जितकी चर्चा रंगली तितकीच लग्नात एकमेकांना दिलेल्या वचनांमुळे देखील हे आगळं-वेगळं लग्न लक्षात राहिलं.

Shibani Dandekar-Akhtar video image

दोघांनी भले ख्रिश्चन पद्धतीनं लग्न केलं असलं तरी त्या पद्धती व्यतिरिक्त या दोघांनी एकमेकांसाठी लिहिलेली खास वचनं सर्वांसमोर वाचून दाखवली. फरहानची बहिण झोया अख्तर,वडिल जावेद अख्तर,सावत्र आई अभिनेत्री शबामा आझमी,आई हनी ईराणी,मित्र हृतिक रोशन,मैत्रिण फराह खान,गायक शंकर महादेवन, तर शिबानीच्या घरचे बहिण अनुषा दांडेकर आणि आई-वडिल व इतर कुटुंबिय अशा आप्तेष्टांनी हा सोहळा रंगलेला आपण साऱ्यांनीच अनुभवला. पण लग्नानंतरही या 'मिस्टर अॅन्ड मिसेस अख्तर'ची चर्चा होतेय. विशेषत: मिसेस. अख्तरची जरा जास्तच.

बोललं जात आहे,शिबानी दांडेकर ही लग्नाआधीच प्रेग्नंट होती. म्हणून घाईघाईत लग्न उरकलं. आता ही सगळी चर्चा सुरू झाली ती शिबानीनं फरहानसोबत लग्नानंतर जे फोटोशूट केलं त्या फोटोंना सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर. चाहत्यांनी तर आई बनण्यासाठी तिला शुभेच्छा देखील देऊन टाकल्या. सगळेच वाट पाहत होते, आता यावर शिबानी काय बोलतेय. तर शिबानी दांडेकरनं या चाहत्यांच्या प्रश्नाला उत्तर दिलेलं आहे. ती म्हणाली आहे,''मी एक स्त्री आहे. पण मी प्रेग्नंट नाही.'' तिनं केलेली पोस्ट इथं आम्ही देत आहोत. “I am woman! I am nottttt pregnant! It was the tequila (sic).” ही पोस्ट करताना तिनं एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात तिनं आरशात आपली परफेक्ट फिगर दाखवत शूट केलं आहे. अर्थात यात तिचं 'फ्लॅट टम्मी' दिसत आहे. ज्या फोटोमुळे प्रेगनन्सीची अफवा पसरली त्यात चुकीच्या पोझमुळे सगळं पुढचं रामायण घडलं हे आलं असेल इतक्यात लक्षात. तर असो,शिबानीनं स्पष्टिकरण दिल्यामुळे आता तिच्या प्रेगनन्सीवरुन रंगलेल्या चर्चा नक्की थांबतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-Russia Relations: ''भारत-रशिया मिळून दहशतवादाला चोख उत्तर देणार'', परराष्ट्र मंत्र्यांचा रशियातून इशारा

Farmer ID : फार्मर आयडी नोंदणीत गोंधळ; सातबारा एकाचा, आधार लिंकिंग दुसऱ्याचे!

MP Nilesh Lanke : पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी; खासदार नीलेश लंके यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

Maharashtra Latest News Update: विधीमंडळाच्या सार्वजनिक उपक्रम समितीची खोपोली ते कुसगाव या मिसिंगलिंक प्रकल्पास भेट

Mokhada News : जगण्यासाठी छळ, मरणानंतर यातना; मोखाड्यातील आदिवासींच्या नशिबाचे दुष्टचक्र

SCROLL FOR NEXT