shikha
shikha 
मनोरंजन

सहा महिन्यांपासून नर्स म्हणून कोरोना रुग्णांची सेवा करणारी 'ही' अभिनेत्री झाली कोरोना संक्रमित

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ

मुंबई-  कोरोना संकटाच्या रोगराईमध्ये वेगवेगळ्या स्तरावर लोक मदतीसाठी एकत्र आले आहेत. या दरम्यान अभिनेत्री शिखा मल्होत्राने एक नर्स म्हणून हॉस्पिटलमध्ये सेवा केली. आता अशी माहिती समोर येतेय की शिखा कोविड-१९ ने संक्रमित झाली आहे. शिखा मल्होत्रा हॉस्पिटलमध्ये दाखल आहे आणि कोविडवर उपचार घेतेय.

शिखाने तिच्या पोस्टमध्ये लिहिलंय, 'कोरोना पॉझिटीव्ह झाल्यानंतर मी लगेचच हॉस्पिटलमध्ये दाखल झाली. आता ऑक्सीजनची कमतरता जाणवतेय. ही पोस्ट त्यांच्यासाठी आहे जे म्हणतात की कोरोना काहीच नाहीये. तुम्हा सगळ्यांच्या शुभेच्छा आणि प्रार्थनासोबत गेल्या सहा महिन्यांपासून सतत कोरोनाच्या रुग्णांच्या सेवेत होती. तुम्हा सगळ्यांच्या प्रार्थनांनी सहा महिन्यांपर्यंत मैदानात सुखी ठेवलं आणि माझा पूर्ण विश्वास आहे की तुम्हा सगळ्यांच्या आशिर्वादाने मी लवकरंच बरी होईन.'

शिखाने पुढे लिहिलंय, 'आत्तापर्यंत कोणतही वॅक्सिन तयार झालेली नाही. तुमची आणि तुमच्या जवळच्यांची काळजी घ्या. सोशल डिस्टंन्सिंग पाळा, मास्क वापरा, नियमित हात पाय धुवा. सॅनिटाईजरचा वापर करा, लक्षात ठेवा आणि दोन फुटांचं अंतर ठेवा. खूप प्रेम आणि सन्मानसाठी आभार, जय हिंद.'  

shikha malhotra serving infected patients now tests covid 19 positive  

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CAA Beneficiary: आधी सीएएची प्रमाणपत्रं वाटली आता तेच लाभार्थी थेट मोदींसोबत स्टेजवर!

IPL 2024 RCB vs CSK Live Score: आनंदाची बातमी! पाऊसाच्या व्यत्ययानंतर बेंगळुरू-चेन्नई सामन्याला पुन्हा सुरुवात

MI vs LSG: मुंबईच्या पराभवानंतर रोहितबरोबर नीता अंबानींची आधी गहन चर्चा अन् मग ड्रेसिंग रुममध्ये दिलं स्पेशल मेडल, Video व्हायरल

मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, सहा महिन्यात POK भारताचा भाग होईल; योगींची मोठी घोषणा

Latest Marathi News Live Update : हे मोदींचे युग आहे, आम्ही घरी घुसून मारतो- पंतप्रधान मोदी

SCROLL FOR NEXT