Shilpa Shetty Photo esakal
मनोरंजन

Shilpa Shetty Photo : 'आता तू म्हातारी झाली शिल्पा! नेटकऱ्यांनी काढली मापं'

वयाची पन्नाशी जवळ आली तरी शिल्पाचा फिटनेस हा तिच्या चाहत्यांसाठी कौतूकाचा विषय असतो.

सकाळ डिजिटल टीम

Shilpa Shetty bollywood actress black transperent dress : बॉलीवूडची फिटनेस फ्रीक शिल्पा शेट्टी ही तिच्या वेगळेपणासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री आहे. वयाची पन्नाशी जवळ आली तरी शिल्पाचा फिटनेस हा तिच्या चाहत्यांसाठी कौतूकाचा विषय असतो. आता शिल्पानं जाळीदार ब्लॅक रंगाच्या कपड्यांमध्ये फोटोशुट केले आहे. पण त्या फोटोंमुळे शिल्पा ट्रोल झाली आहे.

शिल्पाचा फिटनेस पाहून तिच्या वयाचा अंदाज येत नाही. मात्र नेटकऱ्यांना शिल्पाला ट्रोल करायला कोणतंही कारण पुरतं. शिल्पा ही सतत सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणारी अभिनेत्री आहे. ४७ वर्षांच्या शिल्पाचा तो अंदाज व्हायरल झाला असून चाहत्यांनी तिच्यावर कौतूकाचा वर्षाव केला आहे तर काहींनी तिला झणझणीत प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Also Read - अंतरंगातून परमेश्वरापर्यंत भक्तिभाव थेट पोहोचवणारा वेदान्त आश्रम

ब्लॅक रंगाचा तो ट्रान्सपरंट ड्रेस शिल्पाची डोकेदुखी ठरताना दिसतो आहे.त्यावर तिला नेटकऱ्यांनी शेलक्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकानं लिहिलं आहे की, शिल्पा तू आता म्हातारी होत चालली आहे. तेव्हा अशाप्रकारचे कपडे परिधान करुन आमचे लक्ष वेधून घेऊ नकोस. दुसऱ्यानं लिहिलं आहे की, शिल्पा तू ९० च्या दशकांत खूप सुंदर दिसायची आता बराच फरक पडला आहे. ९० च्या दशकांमध्ये आपल्या अभिनयानं आणि सौंदर्यानं शिल्पानं चाहत्यांना भुरळ घातली होती.

एका मुलाखतीमध्ये शिल्पानं आपल्या बहिणीविषयी प्रतिक्रिया दिली होती. त्यामध्ये ती म्हणाली होती की, शमिता गोरी आहे आणि मी सावळी आहे. त्यामुळे मला लहानपणापासून चिडवायचे. जेव्हा शमिता डेब्यु करत होती तेव्हा मला अशी एक भीती होती की ती चित्रपट विश्वात आल्यावर आपल्याला कुणी काम देईल की नाही...शिल्पाचा तो इंटरव्ह्यु देखील व्हायरल झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT