Shilpa Raj 5
Shilpa Raj 5 
मनोरंजन

'पॉर्न आणि कामुक यात फरक'; शिल्पा शेट्टीकडून पती राज कुंद्राचा बचाव

स्वाती वेमूल

अश्लील चित्रफीतप्रकरणी मुंबई पोलिसांनी अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या Shilpa Shetty जुहू इथल्या घरी छापा घातला. पोलिसांनी यावेळी शिल्पा शेट्टीचा जबाब नोंदवून घेतला. कारवाईदरम्यान शिल्पाचा पती आणि या प्रकरणातील मुख्य आरोपी राज कुंद्रालाही Raj Kundra पोलीस तेथे घेऊन गेले होते. यावेळी पोलिसांना दिलेल्या जबाबात शिल्पाने राज कुंद्रा निर्दोष असल्याचं सांगितलं. त्याचप्रमाणे 'हॉटशॉट्स' या अॅपवरील कंटेटबाबत कोणतीही माहिती नसल्याचं तिने स्पष्ट केलं. 'इरॉटिका हे पॉर्नपेक्षा खूप वेगळं आहे आणि पती राज कुंद्राचा पॉर्न फिल्मनिर्मितीत समावेश नव्हता', असं शिल्पा म्हणाली. याप्रकरणी आता अंमलबजावणी संचालनालय (ED) स्वतंत्र तपास करण्याची शक्यता आहे. कारण परदेशातून राज कुंद्राच्या बँक खात्यात मोठ्या प्रमाणावर रक्कम जमा झाली आहे. त्यामुळे फेमा कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवून ईडी याचा स्वतंत्र तपास करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (shilpa shetty claims husband raj kundra is innocent ed likely to register case under fema slv92)

पोलिसांनी शिल्पा शेट्टीची चौकशी का केली?

राज कुंद्राने आर्म्स प्राइम मीडिया ही कंपनी स्थापन केली होती. त्याद्वारे त्याने 'हॉटशॉट' हे अॅप लाँच केलं होतं. हे अॅप लंडन इथल्या केनरिन या कंपनीला विकले होते. मात्र राज कुंद्राच्या विआन इंडस्ट्रीज या कंपनीच्या माध्यमातून हे अॅप चालवले जात होते. या अॅपद्वारे पॉर्न चित्रफितींची निर्मिती आणि प्रसारण केले जात होते, असा आरोप आहे. शिल्पा शेट्टीसुद्धा विआन इंडस्ट्रीज कंपनीत एक संचालक होती. त्यामुळे या गुन्ह्यात शिल्पा शेट्टीचा सहभाग आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत. पोलिसांनी शिल्पाच्या घरातील लॅपटॉप आणि इतर इलेक्ट्रॉनिक दस्तावेज ताब्यात घेतले.

पॉर्नोग्राफीतून मिळालेला पैसा सट्टेबाजीत?

अश्लील चित्रफितींच्या प्रसारणातून आलेला पैसा सट्टेबाजीमध्ये गुंतवल्याचा संशयही पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. जागतिक पातळीवर बेटिंगमध्ये असलेल्या मर्क्युरी इंटरनॅशनल या कंपनीच्या बँक ऑफ आफ्रिका या बँकेच्या खात्यातून राज कुंद्राच्या येस बँकेतील खात्यात काही रक्कम हस्तांतरित करण्यात आली आहे. ही रक्कम सट्टेबाजाराच्या व्यवहारातील असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान शुक्रवारी राज कुंद्राला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला २७ जुलैपर्यंत कोठडी सुनावली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

IPL 2024 MI vs SRH Live Score: सुरुवातीच्या मोठ्या धक्क्यांनंतर सूर्यकुमारचे दमदार अर्धशतक, तिलकनेही दिली भक्कम साथ

Vijay Wadettivar: वडेट्टीवारांविरोधात भाजपची निवडणूक आयोगात तक्रार; मुंबई हल्ल्यावरील विधानावर केलं होतं भाष्य

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

SCROLL FOR NEXT