Shilpa Shetty Kundra welcome daughter via surrogacy.jpg 
मनोरंजन

शिल्पा शेट्टी दुसऱ्यांदा आई; शेअर केला मुलींचा गोंडस फोटो

वृत्तसंस्था, वृत्तसंस्था

हिंदी चित्रपटसृष्टीतील लाडकी अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही दुसऱ्यांदा आई झाली असून तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. १५ फेब्रुवारीलाचा तिने या परीला जन्म दिला आहे व आज सोशल मीडियावर दुसऱ्यांदा आई झाल्याचे तिने जाहीर केले. पण तुम्हाला प्रश्न पडला असेल की, तिच्या प्रेग्नंसीची साधी चर्चाही झाली नाही अन् तिला बाळ कसे झाले?

शिल्पाने नुकताच इन्स्टाग्रामवर आपल्या मुलीच्या हाताचा फोटो शेअर करत ही गूड न्यूज दिली आहे. तिने मुलीचे नाव समीशा शेट्टी कुंद्रा असे ठेवले असून या नावाचा अर्थही सांगितला आहे. आमच्या प्रार्थनेचे उत्तर आम्हाला एका चमत्काराच्या रूपाने मिळाले आहे, असे तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, तर सर्वात सुरवातीला ओम श्री गणेशाय नमः लिहून कॅप्शनची सुरवात केली आहे. मुलीच्या येण्याने शिल्पा व राज अत्यंत खूश आहेत तर त्यांचा मुलगा विहान बहिणीच्या येण्याने उत्साही आहे. 

शिल्पाने सरोगसीद्वारे आपल्या दुसऱ्या मुलीला जन्म दिला. म्हणूनच तिच्या प्रेग्नंसीच्या चर्चा झाल्या नाहीत. शिल्पा तिच्या परफेक्ट फिटनेसमुळे आजही ओळखली जाते. तिला पहिला मुलगा - विहान असून दुसऱयांदा या जोडप्याने सरोगसीद्वारे बाळाला जन्म देण्याचा मिर्णय घेतला होता. शिल्पा दुसऱ्यांदा आई झाल्याने बॉलिवूडमधून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RTI Maharashtra: माहिती अधिकार कायद्यातील बदलांना स्थगिती; मुख्यमंत्र्यांनी अण्णा हजारेंच्या मागण्यांची घेतली दखल, राळेगणसिद्धीत जल्लोष

Shaktipeeth Expressway Protest : शक्तिपीठ महामार्गाविरोधात 7 जुलैला एल्गार; मुंबईत आझाद मैदानावर शेतकऱ्यांचे धरणे, 13 जिल्ह्यांतील बाधित शेतकरी सहभागी होणार!

Latest Marathi News Live Update : केतन अग्रवाल हत्या प्रकरणात सिया आणि चेतनची लाय डिटेक्शन टेस्ट होण्याची शक्यता

Gagangad Fort : स्वामी गगनगिरी महाराजांची तपोभूमी अन् शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेला 'गगनगड' ठरला राज्य संरक्षित स्मारक; शासनाचा मोठा निर्णय

IND vs ENG : 20 चेंडूत अर्धशतक; अभिषेक शर्माने मोडला केएल राहुलचा मोठा विक्रम, इंग्लंडमध्ये रचला इतिहास

SCROLL FOR NEXT