raj shilpa 
मनोरंजन

Video: 'मी राज कुंद्रासारखी दिसते का?'; पत्रकारांना शिल्पा शेट्टीचा प्रतिप्रश्न

शिल्पाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

स्वाती वेमूल

अश्लील चित्रफितनिर्मिती प्रकरणी जवळपास दोन महिन्यांनंतर व्यावसायिक राज कुंद्राला Raj Kundra जामीन मिळाला. राजला जामीन मिळाल्यानंतर सोशल मीडियावर शिल्पा शेट्टीचा Shilpa Shetty एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये शिल्पाला राजविषयी प्रश्न विचारण्यात आला असताना तिने पत्रकारांनाच प्रतिप्रश्न विचारला आहे. "मी राज कुंद्रासारखी दिसते का", असा प्रतिप्रश्न शिल्पा पत्रकारांना करताना दिसतेय. शिल्पाचा हा व्हिडीओ जुना असल्याचं म्हटलं जात आहे.

"मी राज कुंद्रा आहे का? मी त्याच्यासारखी दिसते का? मी कोण आहे?", असे सवाल शिल्पा तिच्यासमोर उपस्थित पत्रकारांना विचारते. त्याचसोबत व्हिडीओच्या शेवटी ती तोंडाला कुलूप लावल्याचा इशारासुद्धा करते.

नव्या सुरुवातीचे संकेत

सोशल मीडियावर सक्रिय असणारी शिल्पा विविध पोस्टद्वारे तिच्या भावना व्यक्त करताना दिसते. काही दिवसांपूर्वीच तिने लेखक कार्ल बार्ड यांच्या पुस्तकातील एक पान शेअर केलं होतं. यामध्ये तिने भविष्याबद्दल सांगण्याचा प्रयत्न केला होता. 'नवीन शेवट', असं त्याचं शीर्षक होतं. भूतकाळात परत जाऊन कोणीच संपूर्णपणे नवीन सुरुवात करू शकत नाही, पण वर्तमानातून सुरुवात करून कोणीही नवीन शेवट नक्कीच करू शकतं, अशा आशयाची ही पोस्ट होती.

राज कुंद्राची साथ सोडून शिल्पा शेट्टी नवीन आयुष्य सुरु करणार?

पती राज कुंद्राच्या अटकेनंतर शिल्पाचं संपूर्ण आयुष्य बदललं. राजच्या अटकेचा तिच्या वैयक्तिक आयुष्यावरही खूप मोठा परिणाम झाल्याचं दिसतंय. या सर्व वादविवादांपासून दूर आपल्या मुलांसह एक नवीन आयुष्य सुरू करण्याच्या विचारात शिल्पा असल्याची चर्चा सध्या बी-टाऊनमध्ये सुरू आहे. यासाठी ती राज कुंद्रा आणि तिच्या जुहू इथल्या घरातून निघून जाणार असल्याचं म्हटलं जातंय. शिल्पाच्या एका मैत्रिणीने दिलेल्या एका मुलाखतीनंतर या चर्चांना सुरुवात झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kisan Veer Sugar Factory: किसनवीर साखर कारखान्यात कामगारांचा उद्रेक, अनेक वर्षांपासून पगार नाही; मंत्री मकरंद पाटील व खासदार नितीन पाटील विरोधात संताप

IND vs WI 1st T20: आज पहिला टी-२०, पण गंभीरांसमोर मोठा पेच! वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन? अर्शदीपच्या कमबॅकसह अशी असेल भारताची Playing XI

MPSC Protest : एमपीएससी आंदोलनात राज ठाकरेंची एन्ट्री ! विद्यार्थ्यांना वस्तुस्थिती सांगत म्हणाले- अध्यक्षांना सरकारही हटवू शकत नाही, कारण...

Marathi News Live Updates: ४५ हजार शेतकऱ्यांचे केळी पीक विमा अर्ज नामंजूर; विमा कंपनीच्या कारभारावर गंभीर आरोप

Supreme Court: फॉर्म ६ला मान्यता दिलीच नाही, सुप्रीम कोर्टाची SIR प्रकरणी केंद्र सरकारसह निवडणूक आयोगाला नोटीस

SCROLL FOR NEXT