shilpa 
मनोरंजन

शिल्पा शेट्टीने चाहत्यांना दिलं नवीन वर्षाचं गिफ्ट, मुलगी समीशाची दाखवली झलक

दिपाली राणे-म्हात्रे

मुंबई- बॉलीवूडची फिटनेस फ्रिक अभिनेत्री शिल्पा शेट्टी तिच्या कुटुंबासोबत सुट्टी एन्जॉय करण्यासाठी गोव्यामध्ये आहे. शिल्पा तिच्या या सुट्टीचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. नुकतंच शिल्पाने तिच्या चाहत्यांना नवीन  वर्षाचं गिफ्ट दिलं आहे. हे गिफ्ट म्हणजे शिल्पाची मुलगी समीशाची पहिली झलक आहे. शिल्पाने तिच्या चाहत्यांसोबत पहिल्यांदा मुलगी समीशाचा चेहरा दाखवला आहे. 

शिल्पा शेट्टी सोशल मिडियावर चांगलीच ऍक्टीव्ह असते. शिल्पा नेहमीच तिच्या कुटुंबातील खास क्षण चाहत्यांसोबत सोशल मिडियावर शेअर करत असते. शिल्पाने नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये तिचा पती राज कुंद्रा आणि मुलगी समीशा दोघेही दिसून येत आहेत. शिल्पा शेट्टीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरुन एक खूपंच क्युट व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा गाणं गाताना दिसतोय. तर समीशा त्याच्यावर रागावताना दिसतेय, हे पाहुन राज त्याचं गाणं चालूच ठेवतो तर समीशा त्याच्यावर आणखी रागावताना दिसतेय. बाप-लेकीची ही नौकझौक पाहायला प्रेक्षकांना आवडतेय. 

शिल्पाने हा व्हिडिओ शेअर करत लिहिलंय, 'काळजी कमी करा आणि जास्त गाणं गा. समिशा शेट्टी कुंद्राने तिचे वडिल राज कुंद्रा यांना सांगितलं की त्यांनी त्यांचं गाणं बंद केलं पाहिजे. तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा.' शिल्पा शेट्टीचा हा व्हिडिओ सगळ्यांना खूप पसंत पडत आहे. चाहत्यांमध्ये ज्यांना समीशाची एक झलक पाहण्याची इच्छा होती त्यांच्यामध्ये हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. तर शिल्पा शेट्टीची मुलगी समीशाचा हा क्युटनेस सगळ्यांना प्रेमात पाडतोय. शिल्पाच्या सिनेमांबाबत सांगायचं झालं तर ती लवकरच 'निकम्मा' या सिनेमात दिसून येणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत भाग्यश्रीचा मुलगा अभिमन्यु दस्सानी आणि शर्ली सेठिया मुख्य भूमिकेत आहेत. याव्यतिरिक्त शिल्पा 'हंगामा २'  सिनेमात परेश रावल आणि मीजान जाफरी यांच्यासोबत दिसून येणार आहे.   

shilpa shetty share her daughters cute video with husband raj kundra  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM, T20 WC: ८ चेंडूंत ४० धावा! अभिषेक शर्माची फिफ्टी, सूर्याला 'स्वच्छ भारत'चा सदिच्छादूत बनवण्याची गावस्करांची मागणी

Khamgaon Crime : सख्ख्या भावाचा खून करून मृतदेह जाळला व राख फेकली नदीत; राहुड येथील घटना, दोन्ही आरोपीस अटक

Latest Marathi News Live Update : ‘शाळा दत्तक धोरणा’वरून पालिका सभेत जोरदार खडाजंगी

Murud News : विद्युत पोलवर काम करताना तरुणाचा मृत्यू; आर्थिक मदतीसाठी नातेवाईकांचा रास्ता रोको

Parth Pawar to Join Rajya Sabha: पार्थ पवार राज्यसभेवर जाणार! राष्ट्रवादीच्या बैठकीत प्रफुल पटेल यांनी केली घोषणा

SCROLL FOR NEXT