Viaan Shetty news  esakal
मनोरंजन

Viaan Shetty: शिल्पा शेट्टीचा 10 वर्षांचा विहान झाला बिझनेसमन, स्टार्ट अप सुरु!

बॉलीवूडची फिटनेस फ्रिक म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही कायम वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत असते.

युगंधर ताजणे

Shilpa Shetty Kundra Son Viaan: बॉलीवूडची फिटनेस फ्रिक म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही कायम वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत असते. गेल्या वर्षी ती तिच्या पती राज कुंद्राच्या पॉर्न व्हिडिओ प्रकरणात (Bollywood Actress News) लाईमलाईटमध्ये आली होती. त्य़ावेळी नेटकऱ्यांनी पतीबरोबरच शिल्पाला देखील ट्रोल केले होते. यावेळी शिल्पानं नेटकऱ्यांच्या आणि (raj kundra) काही माध्यमांच्या विरोधात न्यायालयात धावही घेतली होती. मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. सोशल मीडियावर नेहमीच आपल्या लूक, आणि रियॅलिटी शोमधील कमेंट्सच्या व्हिडिओमुळे चर्चेत असणाऱ्या शिल्पाच्या मुलाची नवीन बातमी समोर आली आहे.

शिल्पाचा दहा वर्षांचा वियान हा आता मोठा उद्योगपती झाल्याचे समोर आले आहे. त्यानं स्वताचा स्टार्ट अप सुरु केले आहे. शिल्पानं लाडक्या लेकाला शुभेच्छा देत त्याचे स्वागत केले आहे. शिल्पानं खास पोस्ट शेयर करत लिहिलं आहे की, त्या सगळ्या बिझनेसची कल्पना ही वियानची आहे. त्यानेच त्याचे डिझाईन केलं आहे. इतकेच नाहीतर व्हिडिओ देखील त्यानं तयार केला आहे. मला त्याचा गर्व आहे. वयाच्या दहाव्या वर्षी त्यानं केलेली कामगिरी मला थक्क करणारी आहे. मी त्याच्या पाठीशी आहे. शिल्पाच्या त्या पोस्टला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे.

शिल्पानं वियानला उद्योगपती आणि संचालक असं म्हटलं आहे. वियाननं आईसाठी एका वेगळ्या प्रकारचे डिझाईन तयार केले आहे. जे शिल्पाला आवडले आहे. तिनं त्या व्हिडिओमध्ये त्या़चा उल्लेख करुन वियानला शाबासकी दिली आहे. वियाननं त्या शुजचे नाव व्रिक्स असे ठेवले आहे. त्याची किंमत त्यानं पाच हजार रुपये एवढी ठेवली आहे. शिल्पानं त्यावर लिहिलं आहे की, माझ्या मुलाचं पहिलं स्टार्ट अप व्हेंचर, तो व्रिक्स या नावानं शुज तयार करतो आहे. त्याच्या नवीन प्रवासासाठी शुभेच्छा....या पोस्टवर शिल्पाच्या चाहत्यांनी देखील वियानला शुभेच्छा दिल्या आहेत.

तो अजून दहा वर्षांचा आहे. पण त्याची समज मोठी आहे. मला त्याचे कायम कौतूक वाटत आले आहे. त्यानं त्याच्या बिझनेसमध्ये जे प्रॉफिट होईल त्यातील दोन टक्के हे चॅरिटी म्हणून द्यायचे असाही निर्णय घेतला आहे. ते ऐकून मला खूप आनंद झाला. आजच्या युगातील मुलं ही खरचं एवढ्या वेगळ्या पद्धतीनं विचार करतात हे पाहून थक्क व्हायला होतं. शिल्पानं अशाप्रकारे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT